JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / 'महाविकास आघाडीचे सरकार कर्माने कोसळेल, 100% महायुतीचं सरकार पुन्हा येईल'

'महाविकास आघाडीचे सरकार कर्माने कोसळेल, 100% महायुतीचं सरकार पुन्हा येईल'

‘धोरणं, घटना, कार्यक्रम वेगळे आहेत. न जमणार सूत्र जमवायचा प्रयत्न केला. मंत्रिमंडळात जाण्यासाठी इच्छुकाची संख्या मोठी आहे. सगळ्यांचे समाधान करू शकत नाहीत. यांचे प्रतिबिंब काल पहायला मिळाले.’ असं विनायक मेटे म्हणाले.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

बीड, 31 डिसेंबर : ‘महाविकास आघाडीचे सरकार त्यांच्या कर्माने कोसळेल. हे शंभर टक्के सांगतो की महायुतीचे सरकार पुन्हा येईल. भारतीय जनता पक्ष हे सरकार पाडणार नाही. तर महाविकास आघाडीमधील लोकच हे सरकार पाडतील’ असा ठाम विश्वास शिवसंग्रामचे आमदारल विनायक मेटे यांनी बोलून दाखवला आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांच्या राजीनामा नाट्यावरही त्यांनी टिपण्णी केली आहे. ते बीडमध्ये पत्रकारांशी बोलत होते. पुढे बोलताना ते म्हणाले की, ‘महाविकास आघाडी ही अनैसर्गिक आघाडी आहे. नुसते राष्ट्रवादी पक्षाचे आमदार नाराज होवून राजीनामे देण्याच्या तयारीत आहेत असे नाही तर शिवसेनेमधील संजय राऊत.. ज्यानी संपूर्ण खिंड लढवली ते शपथविधी सोहळ्याला नव्हते. जेष्ठ नेते रामदास कदम गेले नाहीत. यांच्या बरोबर अनेक सेनेचे नेते सोहळ्याला हजर नव्हते. काँग्रेसचे काही नेते गेले नाहीत. राष्ट्रवादीचे नाराज आमदार राजीनामा देत आहेत. ही तर सुरुवात आहे. “ये तो अभी झाकी है पूरा पिच्चर अभी बाकी है” शेवट काय होणार आहे हे जनतेला माहीत आहे’ अशा शब्दात त्यांनी सरकारवर टीका केली आहे. ‘महाविकास आघाडी नैसर्गिकरित्या काही नाही. प्रत्येक पक्षाचे विचार वेगळे आहेत. धोरणं, घटना, कार्यक्रम वेगळे आहेत. न जमणार सूत्र जमवायचा प्रयत्न केला. मंत्रिमंडळात जाण्यासाठी इच्छुकाची संख्या मोठी आहे. सगळ्यांचे समाधान करू शकत नाहीत. यांचे प्रतिबिंब काल पहायला मिळाले.’ असं विनायक मेटे म्हणाले. दरम्यान, शंभर टक्के सांगतो की महायुतीचे सरकार पुन्हा येईल. महाविकास आघाडीचे सरकार त्यांच्या कर्माने कोसळेल. जेष्ठ माणसाला बाजूला ठेवणं अन्याय आहे. लोकमताचा आदर ठेवून प्रकाश सोळंके यांनी राजीनामा देवू नये. राष्ट्रवादीची नाराजी वाढवावी. पण राजीनामा देवू नये. स्वर्गीय सुंदराव सोळंकेचा वारसा सक्षमपणे चालवत आहेत. त्यांनी राजीनामा देवू नये. धोकेबाज लोकांच्यासोबत राहू नका’ असा सल्ला विनायक मेटे यांनी दिला. इतर बातम्या - ‘Metro Woman’ आश्विनी भिडेंचं प्रमोशन, प्रधान सचिवपदी बढती मंत्रिपद न मिळाल्याने आमदार राजीनामा देण्याच्या तयारीत, अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया ‘आम्ही प्रकाश सोलंकी यांची समजूत काढण्याच काम करत आहोत. मंत्रिमंडळ विस्तार होताना सगळ्यांना घेता येत नाही. त्यामुळे ज्यांना मंत्रिपद दिलं गेलं नाही त्यांची नाराजी कमी करण्याचा प्रयत्न सुरू आहे,’ अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीकडून आता डॅमेज कण्ट्रोलचा प्रयत्न सुरू असल्याचं दिसत आहे. दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन झालं. त्यानंतर आता महिनाभरानंतर मंत्रिमंडळ विस्ताराला मुहूर्त मिळाला आहे. मात्र या मंत्रिमंडळ विस्तारात डावलण्यात आल्याने शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या तीनही पक्षातील असंतोष उफाळून आला आहे. भोर तालुक्यात आमदार संग्राम थोपटे यांना मंत्रिमंडळात स्थान न देण्यात आल्याने त्यांच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षाचा निषेध केला आहे. भोर-वेल्हा विधानसभेचे आमदार संग्राम थोपटे यांचं नाव मंत्रीपदाच्या यादीत नसल्याने त्यांचे समर्थक आक्रमक झाले आहेत. काँग्रेसच्या निषेधाचा काळा फ्लेक्स बनवून तो पेटवून दिला आहे. तर काळ्या फिती बांधून निषेधही व्यक्त करण्यात आला. इतर बातम्या - Modi सरकारकडून शेतकऱ्यांना भेट, ‘या’ तारखेला खात्यात जमा होणार पैसे

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या