JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / SSC RESULT 2019 : 10 वीचा निकाल 'या' दिवशी maharesult.nic.in साईटवर होणार जाहीर

SSC RESULT 2019 : 10 वीचा निकाल 'या' दिवशी maharesult.nic.in साईटवर होणार जाहीर

SSC चा म्हणजे दहावीच्या महाराष्ट्र बोर्डाच्या परीक्षेचा निकाल लवकरच जाहीर करण्यात येणार आहे. हा निकाल maharesult.nic.in या बोर्डाच्या अधिकृत बेवसाईटवरून जाहीर होईल.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

पुणे, 5 जून : SSC म्हणजेच महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत परीक्षा अर्थात दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेचा निकाल लवकरच जाहीर करण्यात येणार आहे. हा निकाल maharesult.nic.in या बोर्डाच्या अधिकृत बेवसाईटवरून जाहीर होईल. शिवाय News18 Lokmat च्या वेबसाईटवरही बोर्डाच्या परीक्षेचा निकाल अधिकृतपणे पाहता येईल. काही वृत्तसंस्था उद्या दहावीचा निकाल जाहीर होणार असल्याचं वृत्त देत आहेत. पण News18 लोकमतशी बोलताना बोर्डाच्या अध्यक्षांनी याला दुजोरा दिलेला नाही. 10 वी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल 7 किंवा 8 जूनला लागू शकतो. बोर्डाच्या वतीने अद्याप निकालाची अधिकृत तारीख जाहीर करण्यात आलेली नाही. जूनच्या पहिल्या आठवड्यात दहावीचा निकाल लागण्याची शक्यता होती. हे लक्षात घेता 6 ते 8 जून दरम्यान निकाल लागू शकतो. बोर्डाने घेतलेल्या HSC म्हणजेच बारावीच्या परीक्षेचा निकाल गेल्या आठवड्यात लागला. 28 मे रोजी दुपारी 1 वाजता निकाल बोर्डाच्या बेवसाईटवर खुला झाला. त्याप्रमाणे 10 वीचा निकालसुद्धा दुपारी जाहीर होण्याची शक्यता आहे. VIDEO : दहावी-बारावीनंतर पुढे काय? कसं निवडाल करिअर? सांगत आहेत अविनाश धर्माधिकारी (भाग - १ ) वेगळ्या क्षेत्रांत कसं मिळवाल यश ? सांगत आहेत अविनाश धर्माधिकारी (भाग - 2) VIDEO करिअर मंत्र : जीवनात यशस्वी कसं व्हाल ? सांगत आहेत अविनाश धर्माधिकारी (भाग - 3) या वर्षी बारावीचा निकाल 85 टक्के लागला आहे. मुलींनी दरवर्षीप्रमाणे यंदाही बाजी मारली. मुलांचा निकाल 82.40 टक्के तर मुलींचा निकाल 90.25 टक्के असा लागला आहे. यंदा 12 वीचा सर्वाधिक निकाल बोर्डाच्या कोकण विभागाचा लागला. कोकणचा निकाल 93. 23 टक्के तर सर्वांत कमी 82.05 टक्के निकाल नागपूर विभागाचा लागला. काय टाळा? काय करा? तज्ज्ञ सांगतात, महत्त्वाचं म्हणजे तुम्ही परीक्षा देऊन झालीय. पेपरमध्ये जे लिहिलंय, ते बदलता येणार नाही. त्यामुळे रिझल्टच्या आधी टेन्शन घेऊ नका. सतत रिझल्टचा विचार करत बसू नका. त्याऐवजी आयुष्यात पुढे काय करायचंय त्याची तयारी करण्यावर भर द्या. दहावी, बारावीची परीक्षा हा एवढ्या मोठ्या आयुष्याचा भाग असतो. आयुष्य नव्हे. आयुष्य अनेक चांगल्या-वाईट घटनांनी घडत असतं. परीक्षेतले मार्क हे काही तुमचं अख्खं आयुष्य नाही. रिझल्टच्या दिवशी विद्यार्थ्यांनी आनंदात रहावं. आपण ज्यामुळे खूश होतो, त्या गोष्टी कराव्यात. आवडती गाणी ऐकणं, सिनेमा पाहणं, गेम्स खेळणं, मित्र-मैत्रिणींबरोबर मोकळ्या हवेत फिरायला जाणं या गोष्टी कराव्यात. आवडते पदार्थही खावेत. ज्यांना योग, मेडिटेशन करायची सवय आहे, तेही करावं VIDEO: मै लिखूँगी क्योंकि… IAS अधिकारी निधी चौधरींनी मांडली व्यथा

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या