मुंबई,24 मे : दहावी- बारावीचे निकाल आता जवळ येऊन ठेपले आहेत. या निकालानंतर काय? असा प्रश्न तुमच्या मनात असेल.तुमचे पालक, मित्रमैत्रिणी, नातेवाईक, वेगवेगळ्या करिअर मार्गदर्शन संस्था अशा माध्यमातून तुम्हाला याबद्दल सल्लेही मिळत असतील.पण अखेर तुमचा मार्ग तुम्हालाच निवडायचा आहे.
तुम्हाला काय करायला आवडतं, तुम्हाला कशात गती आहे याचा अंदाज तुम्हीच घेतलात तर मग या प्रश्नाचं उत्तर तुमच्यासाठी सोपं आहे.
करिअर निवडण्याचा आणि जीवनात यशस्वी होण्याचा हाच मंत्र आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.
हा मंत्र सांगत आहेत, माजी सनदी अधिकारी आणि चाणक्यमंडल या करिअर मार्गदर्शन संस्थेचे संस्थापक अविनाश धर्माधिकारी.
अविनाश धर्माधिकारी यांनी सांगितली आहे, तीन मित्रांची गोष्ट.
एक आहे.. टॉपर. अभ्यासात हुशार.
एक आहे... सेकंड क्लास मिळवणारा
तिसरा ... एक एक वर्षं क्लिअर करत जाणारा पण खेळाच्या मैदानात, शाळेची स्नेहसंमेलनं, शाळा- कॉलेजच्या निवडणुका यात हिरीरीनं भाग घेणारा...
हे तीन मित्र एकमेकांच्या साथीने आपलं करिअर कसं घडवतात ते ऐका या व्हिडिओमध्ये.
अविनाश धर्माधिकारी म्हणतात, पुस्तकी अभ्यास म्हणजेच बुद्धिमत्ता, असा आपला समज असतो. मग हुशारीही टक्केवारीवरून ठरते. दहावीत चांगले मार्क मिळवायचे आणि मग सायन्स घ्यायचं, त्यानंतर मेडिकल किंवा इंजिनिअरिंगला जायचं असं आपण ठरवून टाकतो. पण फक्त टक्केवारीवरून हुशारी ठरत नाही.
तुम्ही पुस्तकी अभ्यासात हुशार नसाल पण तुमच्याकडे कला असेल, नेतृत्वगुण असतील, वेगळं काही करण्याची क्षमता असेल तर हीसुद्धा बुद्धिमत्ताच आहे.
तुमच्यामधली अशी क्षमता कशी ओळखायची याची ही गोष्ट. खास न्यूज 18 लोकमतच्या वेबसाइटवर.
( वेगळ्या क्षेत्रात कसं घडवाल करिअर? पुढच्या भागात ऐका अविनाश धर्माधिकारींकडून.)
=====================================================================================
प्रकाश आंबेडकरांमुळे निवडणुकीची समीकरणं कशी बदलली? पाहा SPECIAL REPORT