VIDEO : दहावी- बारावीनंतर काय? वेगळ्या क्षेत्रांत कसं मिळवाल यश ? सांगत आहेत अविनाश धर्माधिकारी (भाग - 2)

VIDEO : दहावी- बारावीनंतर काय? वेगळ्या क्षेत्रांत कसं मिळवाल यश ? सांगत आहेत अविनाश धर्माधिकारी (भाग - 2)

तुम्हाला ज्या क्षेत्रात करिअर करायचं आहे त्या क्षेत्रात उत्तमतेचा ध्यास घेतला तर तुम्हाला यश नक्कीच मिळेल. इंजिनिअरिंग मेडिकल अशा चाकोरीच्या वाटा सोडून वेगळ्या क्षेत्रातल्या संधी निवडण्याचं धाडस तुम्ही दाखवायला हवं. याबद्दलचं मार्गदर्शन ऐका माजी सनदी अधिकारी आणि 'चाणक्यमंडल' या करिअर मार्गदर्शन संस्थेचे संस्थापक अविनाश धर्माधिकारी यांच्याकडून.

  • Share this:

मुंबई, 25 मे : दहावी- बारावीचे निकाल आता जवळ येऊन ठेपले आहेत. या निकालानंतर काय? असा प्रश्न तुमच्या मनात असेल. रुळलेल्या वाटांप्रमाणे मेडिकल - इंजिनिअरिंगला जायचं की वेगळ्याच क्षेत्रात करिअर करायचं? याबद्दलचं मार्गदर्शन ऐका माजी सनदी अधिकारी आणि 'चाणक्यमंडल' या करिअर मार्गदर्शन संस्थेचे संस्थापक अविनाश धर्माधिकारी यांच्याकडून.

तुम्हाला काय करायला आवडतं, तुम्हाला कशात गती आहे याचा अंदाज तुम्हीच घेतलात तर मग या प्रश्नाचं उत्तर तुमच्यासाठी सोपं आहे.करिअर निवडण्याचा आणि जीवनात यशस्वी होण्याचा हाच मंत्र आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. हा मंत्र सांगत आहेत, माजी सनदी अधिकारी आणि चाणक्यमंडल या करिअर मार्गदर्शन संस्थेचे संस्थापक अविनाश धर्माधिकारी.


तुम्हाला ज्या क्षेत्रात करिअर करायचं आहे त्या क्षेत्रात उत्तमतेचा ध्यास घेतला तर तुम्हाला यश नक्कीच मिळेल. इंजिनिअरिंग मेडिकल अशा चाकोरीच्या वाटा सोडून वेगळ्या क्षेत्रातल्या संधी निवडण्याचं धाडस तुम्ही दाखवायला हवं. तुम्ही विज्ञान, गणित या विषयांत हुशार असलात तरच हुशार आणि एखाद्या कलेत प्रवीण असाल तर मात्र हुशार नाही, हा समजच चुकीचा आहे, असं अविनाश धर्माधिकारी म्हणतात. पुस्तकी बुद्धिमत्ता म्हणजेच फक्त हुशारी, असं नव्हे.

ते सांगतात, दहावी - बारावीला मेरिटमध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांचं प्रचंड कौतुक होतं. पण हेच विद्यार्थी पुढच्या 20- 25 वर्षांनी कुठे आहेत हे तुम्हाला माहीत असतं का? याउलट जीवनाच्या कुठल्याही क्षेत्रात यशस्वी झालेल्या एखाद्या व्यक्तीला तुम्ही विचारून बघा. तुम्हाला दहावी, बारावीमध्ये किती मार्क मिळाले होते... काय असेल त्यांचं उत्तर?

Loading...

त्यांच्या या उत्तरातून तुम्हाला जीवनात यशस्वी होण्याचे धडे मिळतील. ते धडे जाणून घेण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ पाहायलाच हवा.

=======================================================================

SPECIAL REPORT : मृत्यूच्या दारातून लहानग्यांना खेचून आणणाऱ्या 'हिरो'ने सांगितली थरारक कहाणी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: May 25, 2019 03:46 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...