VIDEO करिअर मंत्र : जीवनात यशस्वी कसं व्हाल ? सांगत आहेत अविनाश धर्माधिकारी (भाग - 3)

VIDEO करिअर मंत्र : जीवनात यशस्वी कसं व्हाल ? सांगत आहेत अविनाश धर्माधिकारी (भाग - 3)

तुम्ही जे क्षेत्र निवडाल त्या क्षेत्रात उत्तमता हा ध्यास घेतलात तर यश हमखास मिळणारच. फक्त करिअरमध्येच नाही तर जीवनात यशस्वी कसं व्हायचं, आनंदी कसं राहायचं याचा हा मंत्र आहे. याबद्दलचं मार्गदर्शन ऐका माजी सनदी अधिकारी आणि 'चाणक्यमंडल' या करिअर मार्गदर्शन संस्थेचे संस्थापक अविनाश धर्माधिकारी यांच्याकडून.

  • Share this:

मुंबई, 25 मे : दहावी- बारावीचे निकाल आता जवळ येऊन ठेपले आहेत. या निकालानंतर काय? असा प्रश्न तुमच्या मनात असेल. रुळलेल्या वाटांप्रमाणे मेडिकल - इंजिनिअरिंगला जायचं की कुठल्या वेगळ्याच क्षेत्रात करिअर करायचं? याबद्दलचं मार्गदर्शन ऐका माजी सनदी अधिकारी आणि 'चाणक्यमंडल' या करिअर मार्गदर्शन संस्थेचे संस्थापक अविनाश धर्माधिकारी यांच्याकडून.

यश आणि आनंद

तुम्हाला काय करायला आवडतं, तुम्हाला कशात गती आहे याचा अंदाज तुम्हीच घेतलात तर मग या प्रश्नाचं उत्तर तुमच्यासाठी सोपं आहे.करिअर निवडण्याचा आणि जीवनात यशस्वी होण्याचा हाच मंत्र आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.तुम्ही जे क्षेत्र निवडाल त्या क्षेत्रात उत्तमता हा ध्यास घेतलात तर यश हमखास मिळणारच. फक्त करिअरमध्येच नाही तर जीवनात यशस्वी कसं व्हायचं, आनंदी कसं राहायचं याचा हा मंत्र आहे.

प्रत्येकाकडे जीवनाच्या कोणत्याही एका क्षेत्रात यशस्वी होण्याची बुद्धिमत्ता असतेच. ही बुद्धिमत्ता कल्पकतेने कशी वापरायची, स्वत:ची ओळख कशी करून घ्यायची हे अविनाश धर्माधिकारी जेव्हा सांगतात तेव्हा आपल्याला काहीतरी नवं करण्याची प्रेरणा मिळते. आपल्याला काय येत नाही याहीपेक्षा आपल्याला काय येतं यावर आपल्या जीवनाची इमारत उभी करायला हवी, असं ते म्हणतात. यासाठी प्रख्यात शास्त्रज्ञ आइनस्टाइनची त्यांनी सांगितलेली गोष्ट तुम्हाला नक्कीच आवडेल.

स्वत:ची ओळख

तुझ्या आत डोकावून पाहा... तुला काय येतं, तुला काय समजतं, तू काय एन्जॉय करतोस? असे प्रश्न स्वत:ला विचारून बघा. याची तुम्ही मनापासून दिलेली उत्तरं म्हणजे स्वत:ची ओळख. तुम्ही जे आवडीने करता त्याच्याशी तुमच्या करिअरचा संबंध आहे. अमुक एका करिअरला स्कोप आहे का, असा प्रश्न अनेक जण विचारतात. पण एखाद्या करिअरला स्कोप नसतो तर स्कोप हा व्यक्तीला असतो, असं माझं मत आहे, असं ते म्हणतात. तुम्हाला हा स्कोप कसा मिळेल यासाठी पाहा हा व्हिडिओ.

============================================================================================

VIDEO : दुसऱ्यांदा पंतप्रधान!, संसद भवनात नरेंद्र मोदींची धडाकेबाज एंट्री

First published: May 26, 2019, 2:52 PM IST
Tags:

ताज्या बातम्या