JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Monsoon Update : दिलासादायक! या राज्यांना हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्ट; महाराष्ट्रात आजपासून मुसळधार पाऊस!

Monsoon Update : दिलासादायक! या राज्यांना हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्ट; महाराष्ट्रात आजपासून मुसळधार पाऊस!

हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलेल्या अंदानुसार येत्या 24 तारखेपासून राज्यात पावसाचा जोर वाढणार आहे. तर काही भागात सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

जाहिरात

मान्सून अपडेट

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 23 जून : भारतीय हवमान विभागाने (IMD) वर्तवलेल्या अंदाजानुसार येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये दक्षिण भारताचा काही भाग, ओडिशाचा उर्वरीत भाग, पश्चिम बंगाल, झारखंड, बिहार, छत्तीसगड, उत्तर प्रदेश, उत्तराखंड आणि मध्यप्रदेशाच्या काही भागांमध्ये मान्सूनसाठी (Monsoon अनुकूल वातावरण निर्माण झालं आहे. ओडिशाच्या अनेक भागांत मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. यासोबतच अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, पश्चिम बंगाल, सिक्कीम आणि महाराष्ट्राच्या कोकण विभागात देखील जोरदार पावसाचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. पश्चिम बंगाल, बिहार, झारखंड आणि सिक्कीम या राज्यात हवामान खात्याकडून ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. किनारपट्टीवरील भागांना इशारा  हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार आजपासून हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पूर्व राजस्थान, उत्तर प्रदेश, नागालँड, मणिपूर, मिझोरम, महाराष्ट्र आणि त्रिपुरामध्ये विजेचा कडकडाट आणि वादळीवाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार आज केरळ, कर्नाटक, गोवा , कोकण आणि आंध्र प्रदेशच्या समुद्र किनाऱ्यांवरून प्रति तास 65 किलोमीटर वेगानं वारे वाहन्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर मच्छिमारांना समुद्रात मासेमारी करण्यासाठी न जाण्याचे आवाहन हवामान विभागाच्या वतीनं करण्यात आले आहे.

Weather Update Today : महाराष्ट्रात कुठे होणार वरुणराजाचं आगमन,पाहा मुंबईसह 6 शहरांचं तापमान

संबंधित बातम्या

महारष्ट्राची स्थिती हवामान विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रात आजपासून मध्य महाराष्ट्र, विदर्भ मराठवाडा आणि कोकणामध्ये वादळीवाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसचे कोकण किनारपट्टीवर तीव्र गतीने वारे वाहनार असून, मच्छिमारांना समुद्रात मासेमारी करण्यासाठी न जाण्याचा सल्ला हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलेल्या अंदानुसार येत्या 24 तारखेपासून राज्यात पावसाचा जोर वाढणार असून, याचदरम्यान मराठवाड्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या