वरळी, 24 ऑक्टोबर : संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल लागण्यास सुरुवात झाली आहे. यात सगळ्यात महत्त्वाच्या अशा वरळी विधानसभा मतदारसंघाकडे सगळ्यांचं लक्ष आहे. हाती लागलेल्या निकालानुसार, वरळीतून आदित्य ठाकरे सात हजार मतांनी आघाडीवर आहेत तर अभिजीत बिचुकलेला अद्याप एकही मत मिळालेलं नाही आहे. आदित्य ठाकरेंना आव्हान देण्यासाठी राष्ट्रवादीने या मतदारसंघातून सुरेश माने यांना उमेदवारी दिली. या हाय प्रोफाईल लढतीमुळे वरळीचं राजकीय वातावरण तापलं असतानाच आपल्या हटके स्टाईलसाठी ओळखल्या जाणाऱ्या बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांनी वरळी विधानसभेच्या निवडणुकीत एण्ट्री घेत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला होता. वरळी विधानसभा मतदारसंघाचा Exit Poll News18 Lokmat आणि IPSOS ने केलेल्या मतदानोत्तर चाचणीत भाजप- शिवसेना महायुतीला मोठं बहुमत मिळणार असा अंदाज वर्तवण्यात आला होता. 288 जागा असलेल्या महाराष्ट्र विधानसभेत बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांचा आकडा गाठावा लागतो. महायुतीला 243 जागा मिळतील, असं या Exit Poll चा निकाल सांगतो. हाती लागलेल्या Exit Poll नुसार वरळी मतदारसंघामध्येआदित्य ठाकरे बाजी मारणार असल्याचं सांगण्यात आलं होतं. पहिल्यांदाच विधानसभेत उमेदवारी मिळवणारे आदित्य ठाकरे बाजी मारणारील असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. वरळी विधानसभा मतदारसंघाचा इतिहास खरंतर वरळी हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. 2014 च्या विधानसभा निवणुकीत शिवसेनेचे सुनील शिंदे वरळीचे आमदार झाले. त्याआधी 2009 मध्ये सचिन अहिर आमदार झाले. आता सचिन अहिर यांच्या सेनाप्रवेशाचा आदित्य ठाकरेंना किती फायदा होतो हे या लढतीमध्ये कळेल. इतर बातम्या - महाराष्ट्राची सगळ्यात मोठी बातमी, निकालाआधीच युतीमध्ये सुरू झाले मतभेद! वरळी विधानसभा निवडणूक 2014 निकाल सुनील शिंदे, शिवसेना - 60 हजार 625 सचिन अहीर, राष्ट्रवादी - 37 हजार 613 हा आहे वरळी विधानसभा मतदारसंघाचा इतिहास 1962 – माधव नारायण बिरजे (काँग्रेस) इतर बातम्या - Parli Election Result 2019 LIVE: परळीतून बाजी पलटली, धनंजय मुंडे आघाडीवर 1967 – माधव नारायण बीरजे (काँग्रेस) 1972 – शरद शंकर दिघे ( काँग्रेस) 1978 - प्रल्हाद कृष्णा कुरणे (कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया) (मार्क्सवादी) 1980 - शरद शंकर दिघे ( काँग्रेस) 1985 - विनिता दत्ता सामंत (अपक्ष) 1990, 1995, 1999, 2004 - दत्ताजी नलावडे (शिवसेना) मतदारसंघ पुनर्रचना 2009 – सचिन अहिर (राष्ट्रवादी काँग्रेस) 2014 – सुनील शिंदे ( शिवसेना) इतर बातम्या - Assembly Elections: Maharashtra Election Result 2019 LIVE: सर्वात मोठी बातमी- सातारा लोकसभा पोटनिवडणूक: उदयनराजे भोसले पिछाडीवर