JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / भाजपच्या सत्तेला धोका? महाराष्ट्राला मिळू शकतो नवा मुख्यमंत्री

भाजपच्या सत्तेला धोका? महाराष्ट्राला मिळू शकतो नवा मुख्यमंत्री

विधानसभा निवडणुकीच्या निकालाचे कल पाहता भाजपला अपेक्षित यश मिळालेलं नाही. त्यामुळे निकालानंतर राजकीय गणितं बदलण्याची शक्यता आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

**मुंबई, 24 ऑक्टोबर :**विधानसभा निवडणुकीच्या निकालाचे कल पाहता भाजपला अपेक्षित यश मिळालेलं नाही. त्यामुळे निकालानंतर राजकीय गणितं बदलण्याची शक्यता आहे. विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीचे कल आता समोर येत असून भाजपला अपेक्षित यश मिळण्याची शक्यता कमी आहे. एक्झिट पोलमध्ये एकट्या भाजपला 140 पर्यंत जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात येत होता. तर दुसरीकडे युतीतला सहकारीपक्ष शिवसेनेला 102 जागा मिळतील असं म्हटलं जात होतं. पण सध्याचा कल पाहता भाजप-शिवसेना युतीला 150 ते 170 जागा मिळतील असं दिसत आहे. सध्या युती 166 आघाडी 94, वंचित 1 तर इतर 28 उमेदवार आघाडीवर आहेत. हे चित्र असंच राहिलं तर भाजपला सत्तास्थापनेसाठी शिवसेनेवर अवलंबून रहावं लागणार आहे. अशा परिस्थितीत शिवसेनेची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. यंदाची निवडणूक शिवसेनेसाठी खास आहे. कारण यावेळी आदित्य ठाकरेंना वरळी मतदारसंघातून मैदानात उतरवलं आहे. ठाकरे कुटुंबातील पहिलीच व्यक्ती निवडणुकीच्या रिंगणात उतरली आहे. आदित्य ठाकरेंना उमेदवारी घोषित करण्याआधीच त्यांच्या मुख्यमंत्रीपदाची चर्चा रंगली होती. अनेक नेत्यांनी याबाबत उघड वक्तव्य केलं. दुसरीकडे शिवसेना पक्षप्रमुक उद्धव ठाकरे यांनीही भाषणांमधून भविष्य़ात शिवसेनेचा मुख्यमंत्री होईल असं म्हटलं होतं. शिवसेनेचा मुख्यमंत्री करणं हे बाळासाहेबांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी शिवसेना प्रयत्न करू शकते. त्यासाठी आघाडीशी हातमिळवणीची शक्यता नाकारता येत नाही. सत्तेसाठी राजकीय पक्ष काहीही करू शकतात. वाचा : शिवसेनेचा गड काबीज करण्यात राष्ट्रवादीच्या उमेदवाराला यश आघाडी सध्या 94 जागांवर पुढे शिवसेनेच्या 63 जागा मिळून बहुमताचा आकडा सहज पार करू शकतात. त्यामुळे शिवसेनेनं मनात आणलं तर काँग्रेस राष्ट्रवादीच्या मदतीने सरकार स्थापन करता येऊ शकतं. शिवसनेसोबत सत्ता स्थापनेची वेळ आली तर काँग्रेसही त्यासाठी तयार होण्याची शक्यता आहे. काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी भाजपला सत्तेतून दूर ठेवण्याला प्राधान्य देऊ असं ट्विट केलं होतं. यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेना यांनी एकत्र सरकार स्थापन केलं तर आश्चर्य वाटायला नको. वाचा : अशोक चव्हाणांनी गड राखला, भाजपचा मास्टरप्लॅन ठरला फेल 2009 मध्ये आघाडीने 155 जागा जिंकल्या होत्या. भाजप शिवसेना युतीने 91 तर मनसेसह इतर पक्षांनी मिळून 42 जागा जिंकल्या होत्या. आघाडीने पुन्हा सत्ता हस्तगत केली होती. मात्र त्यानंतर 2014 च्या निवडणुकीत सर्वच पक्षांनी स्वतंत्र जागा लढवल्या आणि सत्तांतर झाले. यामध्ये भाजपने सर्वाधिक 122 जागा जिंकल्या होत्या आणि शिवसेनेला 63 जागा मिळाल्या होत्या. काँग्रेस राष्ट्रवादीला मोठा फटका बसला होता. त्यांना 155 वरून 90 जागांवर समाधान मानावं लागलं होतं. 2014 मध्ये निकालानंतर भाजप शिवसेनेनं युती केली होती. दरम्यान, अनेकदा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सरकाच्या धोरणांवर टीका केली होती. तसेच युतीतून बाहेर पडण्याचा इशाराही दिला होता. त्यामुळे आता जर संधी मिळाली तर काँग्रेस राष्ट्रवादीच्या मदतीने सत्ता काबीज करू शकतात. यासाठी आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री करण्याची मागणी त्यांनी ठेवली तर त्यात अतिशयोक्ती नसेल. आघाडीसुद्धा यासाठी तयार होईल काऱण यामुळे भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्याचा उद्देश पूर्ण होईल. विधानसभेचे पहिले 12 निकाल एका क्लिकवर, राणे, पवार आणखी कोण झालं विजयी? कर्नाटकातही काँग्रेसने भाजपला सत्ता स्थापनेपासून रोखण्यासाठी जेडीएसलला पाठिंबा दिला होता. अर्थात तिथलं सरकार वर्षभर टिकलं. पण इथं शिवसेनेला मुख्यमंत्रीपदाची ऑफर देऊन सत्तेसाठी आघाडीने हालचाली केल्या तर महाराष्ट्राच्या राजकारणातली ही ऐतिहासिक निवडणूक ठरेल. सत्तेसाठी अनेक नेत्यांनी विधानसभा निवडणुकीच्या आधी काँग्रेस-राष्ट्रवादीतून भाजप शिवसेनेत प्रवेश केला होता. यामुळे युतीला बंडखोरीचाही फटका बसला आहे. दरम्यान, भाजप हातची सत्ता जाऊ नये यासाठी शिवसेनेसोबत तडजोडीला तयार होऊ शकते. सर्व जागांचे निकाल जाहीर झाल्यानंतरच चित्र स्पष्ट होईल. त्यात जर सेनेला अधिक जागा मिळाल्या तर ते सत्तेत जास्त वाटा मागू शकतात. प्रसंगी मुख्यमंत्रीपदासाठीही अडून बसण्याची शक्यता आहे. आता निकाल काय येईल यावरच सेनेची भूमिका ठरेल. मुख्यमंत्रीपद मागणार की पुन्हा एकदा भाजपसोबत सत्तेत राहणार हे निकालानंतर समजेल. LIVE VIDEO : छगन भुजबळांनी भाजपला सुनावले, उदयनराजेंना फटकारले

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या