JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / युती झाल्याने काँग्रेस-राष्ट्रवादीच्या गाडीचं चाक पंक्चर - उद्धव ठाकरे

युती झाल्याने काँग्रेस-राष्ट्रवादीच्या गाडीचं चाक पंक्चर - उद्धव ठाकरे

‘राहुल गांधी देशद्रोह्यांना वाचविण्यासाठी जाहीरनामा प्रसिद्ध करतात का?’

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

प्रविण मुधोळकर, रामटेक, 7 एप्रिल : शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रविवारी रामटेक मतदारसंघातले युतीचे उमेदवार कृपाल तुमाने यांच्यासाठी सभा घेतली आणि आघाडीवर हल्लाबोल केला. विदर्भातल्या 7 जागांवर 11 एप्रिलला तारखेला मतदान होत आहे. आजचा रविवार हा प्रचाराचा शेवटचा रविवार असल्याने सगळ्याच पक्षांची प्रचाराची धूम होती. उद्धव ठाकरे म्हणाले, काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने जनसंघर्ष यात्रा गेल्या चार वर्षात काढल्या त्यांना वाटले की सेना भाजप एकमेकांशी भांडण करताहेत त्यामुळे आपलं जमलं. पण आम्ही युती केली आणि काँग्रेस राष्ट्रवादीच्या गाडीचे टायर पंचर केले. राहुल गांधींवर टीका विरोधी पक्षातील लोक देशद्रोह आहेत असे माझे म्हणने नाही. राहुल गांधी हे युती सरकार नालायक आहे हे सांगताहेत पण त्यांनी वचन दिलेत ते काही पूर्ण झाले नाही. जो कुणी देशद्रोही असेल त्याला फासावर लटकवला जाईल. राहुल गांधी देशद्रोह्यांना वाचविण्यासाठी जाहीरनामा प्रसिद्ध करतात अशी टीकाही त्यांनी केली. शेतकरी आत्महत्या प्रचार आपण करतोय जरूर करा. पण शेतकऱ्यांना आवाहन आहे की त्यांनी आत्महत्या करू नका. शेतकऱ्यांची अवस्था बिकट पण आई जगदंबा आणि शिवरायाची सर्व शक्ती लावून शेतकऱ्यांना मदत करू. जर शेतकरी, महिला यांचे प्रश्न सुटले नाही तर आम्ही भगवा हातात घेण्यासाठी लायक नाही असंही ते म्हणाले. मोदी 26 एप्रिलला अर्ज भरणार पंतप्रधान मोदी 26 एप्रिल रोजी वाराणसीतून आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत. 25 तारखेलाच मोदी वाराणसीत दाखल होतील. उमेदवारी अर्ज भरताना ते भव्य रोड शोही करणार आहेत. 2014 च्या साली मोदी वाराणसीतून निवडून आले होते. या निवडणुकीतही पंतप्रधान दोन जागांवरून लढतील असं बोललं जात होतं मात्र ते दोन जागांवरून न लढता फक्त वाराणशीतूनच लढणार आहे. 2014 च्या निवडणुकीवेळी त्यांनी केलेला रोड शो चांगलाच गाजला होता. त्याची चर्चाही देशभर झाली होती.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या