JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / विदर्भात कोरोनाचा कहर! अमरावतीत लॉकडाऊन, इतर जिल्ह्यांमध्ये काय आहेत निर्बंध?

विदर्भात कोरोनाचा कहर! अमरावतीत लॉकडाऊन, इतर जिल्ह्यांमध्ये काय आहेत निर्बंध?

अमरावतील उद्यापासून लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

अमरावती, 21 फेब्रुवारी : राज्यातील अनेक भागांमध्ये कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. तर दुसरीकडे अमरावती या जिल्ह्यात 8 दिवसांचा लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. पुण्यातही कोरोनाचे नियम अधिक कडक करण्यात आले आहेत. आता विभागातील पाच जिल्ह्यांच्या (अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा, वाशिम) दृष्टीनं प्रतिबंधात्मक उपाययोजनासाठी नवी नियमावली लागू करण्यात आली आहे. विभागीय आयुक्त पियुष सिंह यांनी हे आदेश पारीत केल्याची माहिती समोर येत आहे. कोरोनाची रुग्णसंख्या वाढत असल्याने नियमावली अधिक कडक करण्यात आली आहे. -सर्व प्रकारची दुकाने/ आस्थापने ही सकाळी 9 ते सायंकाळी 5 पर्यंत सुरू राहतील -सर्व प्रकारची उपहारगृहे हॉटेल्स प्रत्यक्ष सुरू न ठेवता फक्त पार्सल सुविधेत परवानगी राहील. - लग्नसमारंभकरिता 25 व्यक्तींना वधू-वरासह परवानगी राहील - जिल्हा बस वाहतूक करताना बसमधील असलेल्या एकूण प्रवासी श्रमतेच्या 50 टक्के प्रवासी वाहतुकीकरिता परवानगी राहील - राजकीय आणि धार्मिक कार्यक्रम बंद - खासगी आणि सरकारी वाहनात मास्क बंधनकारक - रिक्षामध्ये चालकासह दोघांनाच परवानगी - ग्राहकांना जवळच्याच दुकानांतून खरेदी करण्याचा सल्ला - धार्मिक स्थळं ही एका वेळी दहा व्यक्तींपर्यंत मर्यादित स्वरूपात नागरिकांसाठी सुरू राहतील. - संपूर्ण अमरावती विभागातील ग्रामीण आणि शहरी भागामध्ये संचारबंदीच्या कालावधीत सर्व प्रकारची शाळा, महाविद्यालय, शैक्षणिक प्रशिक्षण केंद्रे, खाजगी शिकवणी वर्ग, कोचिंग क्लासेस बंद राहतील. - अमरावती विभागातील ग्रामीण आणि शहरी भागांमध्ये संचारबंदीच्या कालावधीत सर्व प्रकारची सिनेमागृहे, व्यायाम शाळा, जलतरण तलाव, मनोरंजन, उद्याने, नाट्यगृहे संबंधित ठिकाणेही बंद राहतील. वाशिममध्येही कडक नियम जिल्ह्यातील सर्व प्रकारची दुकाने आणि आस्थापना सकाळी 9 ते 5 वाजेपर्यंत खुली राहणार सर्व प्रकारची उपहारगृहे, हॉटेल्स बंद, केवळ पार्सल सुविधा सुरू लग्नसमारंभासाठी पूर्व परवानगी घेऊन केवळ 25 व्यक्तींना सहभाग घेता येणार 50 टक्के प्रवाशी क्षमतेने होणार एसटीची आंतरजिल्हा वाहतूक शनिवारी सायंकाळी 5  वाजल्यापासून सोमवारी सकाळी 7 वाजेपर्यंत संचारबंदी… हे ही वाचा- Lockdown Returns : कोरोना बळावतोय; राज्यातील ‘या’ जिल्ह्यात पुन्हा लॉकडाऊन दरम्यान अमरावतीमध्ये उद्या सायंकाळी 8 वाजल्यापासून पुन्हा लॉकडाऊन लागू करण्यात येणार असल्याचं जाहीर करण्यात आलं आहे. अमरावती विभाग हा कोरोनाचा हॉटस्पॉट ठरत आहे. अमरावती जिल्ह्यात कोरोना रुग्ण वाढत असल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी ही घोषणा केली. अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयात  बैठकी दरम्यान हा निर्णय घेण्यात आला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या