Lockdown Returns : कोरोना बळावतोय; राज्यातील 'या' जिल्ह्यात पुन्हा लॉकडाऊन

Lockdown Returns : कोरोना बळावतोय; राज्यातील 'या' जिल्ह्यात पुन्हा लॉकडाऊन

राज्यात कोरोनाची रुग्णसंख्या पुन्हा वाढत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे

  • Share this:

अमरावती, 21 फेब्रुवारी : राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. पुण्यात पुन्हा एकदा कोरोनाची नियमावली अधिक कडक केल्यानंतर आता अमरावतीमध्ये उद्या सायंकाळी 8 वाजल्यापासून पुन्हा लॉकडाऊन लागू करण्यात येणार असल्याचं जाहीर करण्यात आलं आहे. अमरावती विभाग हा कोरोनाचा हॉटस्पॉट ठरत आहे. अमरावती जिल्ह्यात कोरोना रुग्ण वाढत असल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी ही घोषणा केली. अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयात  बैठकी दरम्यान हा निर्णय घेण्यात आला.

अमरावतीतील अनेक भागांमध्ये कोरोनाची रुग्णसंख्या वाढत आहे. येथे एक आठवड्याचा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. अमरावतीतील 60 टक्के भागात कोरोनाचा प्रसार होत असल्याचं वृत्त समोर आले होतं. त्यानंतर कोरोनाची वाढलेली रुग्णसंख्या पाहता येथे पुढील 8 दिवसांचा लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. यादरम्यान नागरिकांच्या लॉकडाऊनच्या नियमांचा पालक करणे बंधनकारक असणार आहे.

दरम्यान या विभागातील पाच जिल्ह्यांच्या (अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा, वाशिम) दृष्टीनं कोविड 19 च्या प्रतिबंधात्मक उपाययोजनासाठी सुधारित निर्देश लागू करण्यात आले आहेत.

हे ही वाचा-पुण्यात कोरोनामुळे पुन्हा कडक निर्बंध; काय राहणार सुरू आणि काय बंद, वाचा

अमरावती जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने आज जिल्ह्याचे पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्या उपस्थितीत जिल्ह्यातील महत्त्वाच्या अधिकाऱ्यांची बैठक पार पडली. या बैठकीत जिल्ह्यातील मनपा क्षेत्रात व अचलपूर तालुक्यात उद्या सायंकाळी आठ वाजल्यापासून एक आठवड्यासाठी लॉकडाऊनची घोषणा जिल्ह्याचे पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी केली आहे. लॉकडाऊन लावण्याची इच्छा नाही मात्र कोरोनाची संख्या वाढत असल्याने हा निर्णय घेत असल्याचे पालकमंत्री ठाकूर यांनी यावेळी सांगितलं.

First published: February 21, 2021, 4:55 PM IST

ताज्या बातम्या