JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Women's Day 2023: लातूरमधील 'या' गावात महिलाराज; स्त्रियांच्या हाती आहे संपूर्ण कारभार, Video

Women's Day 2023: लातूरमधील 'या' गावात महिलाराज; स्त्रियांच्या हाती आहे संपूर्ण कारभार, Video

International Women’s Day: लातूरमधील आनंदवाडी गौर या गावात महिलाराज आहे. सरपंच आणि सर्व सदस्य स्त्रियाच असून कुटूंबप्रमुखही महिलाच आहेत.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

ऋषिकेश होळीकर, प्रतिनिधी लातूर, 7 मार्च: जगभरात महिला विविध क्षेत्रातील यशाची शिखरे पादाक्रांत करत आहेत. 8 मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातो. भारतीय महिलाही राजकारण, कला, क्रीडा आदी क्षेत्रांत नेतृत्व करत आहेत. तरीही ग्रामीण भागात या क्षेत्रांत काही प्रमाणात पुरुषांचीच मक्तेदारी दिसते. मात्र, लातूरमधील निलंगा तालुक्यात आनंदवाडी (गौर) हे गाव असून गावात पूर्णपणे महिलाराज आहे. आनंदवाडीतील संपूर्ण कारभार स्त्रियाच पाहतात. ग्रामपंचायतीत सर्व महिला सदस्य आनंदवाडी (गौर) येथील ग्रामपंचायतीत सरपंच व सर्व सदस्य महिला आहेत. निवडणुकीमध्ये महिलांनाच प्रतिनिधित्व देऊन ग्रामपंचायत बिनविरोध करण्यात आली. त्यामुळे राज्यात एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे. मागील पाच वर्षाच्या काळात महिला सरपंच म्हणून भाग्यश्री चामे यांनी उत्कृष्ट काम केले आहे. त्यामुळे गावाचा राज्यात नावलौकिक झाला असून विविध पुरस्कारही मिळाले आहेत.

घरातील कुटूंब प्रमुख महिला आनंदवाडी (गौर) हे जवळपास 650 लोकसंख्येचे गाव असून गावात 112 घरे आहेत. एकेकाळी ग्रुप ग्रामपंचायत असणाऱ्या आनंदवाडीला 1993 च्या दरम्यान पूर्ण ग्रामपंचायतीचा दर्जा मिळाला. गावातील प्रत्येक घरात कुटूंब प्रमुख महिला आहेत. विशेष म्हणजे घरही महिलांच्याच नावावर असून दारावरील नावाची पाटीही महिलांच्याच नावची आहे. Women’s Day 2023: आठवीत लग्न, 8 विषयात एम.ए. अन् डॉक्टरेट! विदर्भाच्या सुनेचा प्रवास पाहून वाटेल अभिमान, Video धार्मिक कार्यक्रमात महिलांनाच मान गावांमधील धार्मिक लग्न समारंभ व इतर समारंभांमध्ये महिलांची पंगत पहिल्यांदा बसविले जाते. विधवा महिलांना हळदी कुंकवाचा मान इतरत्र दिला जात नाही. पण या गावांमध्ये प्रत्येक संक्रांतीला विधवा महिलांचे सामूहिक हळदी-कुंकवाचा कार्यक्रम राबविला जातो. विधवा महिला समाजापासून दुरावल्या जाऊ नयेत, यासाठी हा कार्यक्रम राबविला जातो. विविध शिबिरांचे आयोजन ग्रामपंचायतच्या मार्फत दरवर्षी सर्व रोग निदान शिबिराचे आयोजन केले जाते. रक्तदान शिबिर आयोजित करून रक्तदानाविषयी लोकजागृती केली जाते. या सर्वांमध्ये पुरुषांनी महिलांना पुढाकार दिल्यामुळे या गावची संस्कृती ही स्त्रीप्रधान असल्याचे दर्शन होते. आनंदवाडी या गावाला आत्तापर्यंत वेगवेगळ्या 15 पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आली आहे. यामध्ये जिल्हास्तरीय राज्यस्तरीय पुरस्कारांचा समावेश आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या