JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Latur News: थायरॉईडच्या रुग्णांसाठी मोठी बातमी, दर आठवड्यात 'या' दिवशी करा मोफत तपासणी, Video

Latur News: थायरॉईडच्या रुग्णांसाठी मोठी बातमी, दर आठवड्यात 'या' दिवशी करा मोफत तपासणी, Video

थायरॉईड रुग्णांसाठी महत्त्वाची बातमी आहे. राज्यातील सर्व सरकारी रुग्णालयात मिशन थायरॉईड अंतर्गत मोफत उपचार करण्यात येणार आहेत.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

ऋषिकेश होळीकर, प्रतिनिधी लातूर, 3 एप्रिल: भारतात अनेकांना थायरॉईडच्या समस्येला सामोरे जावे लागते. विशेषत: महिलांमध्ये थायरॉईड होण्याचे प्रमाण जास्त आहे. त्यासाठीच राज्यात ‘मिशन थायरॉईड’ ही आरोग्य मोहीम हाती घेण्यात आली आहे. लातूर जिल्ह्यातील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दर गुरुवारी मोफत तपासणी व उपचार केले जाणार आहेत, अशी माहिती अधिष्ठाता डॉ. समीर जोशी यांनी दिली आहे. 30 मार्चपासून अभियानास प्रारंभ मिशन थायरॉईड हे अभियान 30 मार्चपासून सुरू करण्यात आले आहे. राज्यातील सर्व वैद्यकीय महाविद्यालयांच्या रुग्णालयात थायरॉईड निदान आणि उपचार करण्यात येणार आहेत. दर गुरुवारी थायरॉईड ओपीडी चालवली जाणार असल्याची माहिती विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठता डॉक्टर समीर जोशी यांनी दिली.

महिलांमध्ये थायरॉईडचे प्रमाण अधिक सद्यस्थितीत एक लाख स्त्रियांमध्ये अंदाजे दोन हजार स्त्रियांना दृश्य स्वरूपात थायरॉईडची गाठ मानेवर दिसून येते. त्याचप्रमाणे अनेक महिलांना थायरॉईडची गाठ मानेवर दिसत नसताना विविध थायरॉईडचे आजार झालेले आहेत. त्यातील बऱ्याचशा थायरॉईडच्या आजारांचे दीर्घकाळापर्यंत निदान होत नाही. अशा सर्व स्त्रिया तसेच पुरुष व बालकांना या संपूर्ण अभियानाचा फायदा होणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले. प्रत्येक गुरुवारी औषध वैद्यकशास्त्र विभागातर्फे ओपीडी मिशन थायरॉईड या अभियानाचे उद्दिष्ट थायरॉईड रोगासंदर्भात जनजागृती करणे व त्या संबंधात सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये थायरॉईड उपचारासाठी विविध सोयी उपलब्ध करून देणे हे आहे. विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे दर गुरुवारी दुपारी बारा वाजता औषध वैद्य शास्त्र विभागांतर्गत विशेष थायरॉईड ओपीडी चालवली जाणार आहे. थायरॉईडच्या विविध रोगांनी ग्रस्त असलेल्या गरजू रुग्णांनी दर गुरुवारी बारा वाजता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे येऊन तपासणी करून घ्यावी, असे आवाहन अधिष्ठाता समीर जोशी यांनी केले. पहिली बेटी धनाची पेटी, कुटूंब नियोजन केल्यास मिळणार 50 हजार रुपये मोफत तपासणी व उपचार या अभियानांतर्गत लातूर जिल्ह्यात येत्या एक वर्षात एक लाख रुग्णांची तपासणी हे उद्दिष्ट समोर ठेवून वाटचाल चालू केली आहे. थायरॉईड ग्रस्त रुग्णांना मोफत तपासणी व त्यावरील उपचार मोफत ठेवण्यात आले आहेत. एखाद्या रुग्णाचे शस्त्रक्रिया करण्याची वेळ आली असेल तर शस्त्रक्रियाही मोफत करण्यात येणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या