ऋषिकेश होळीकर, प्रतिनिधी लातूर, 18 फेब्रुवारी: राज्यात 12 वी बोर्डाच्या परीक्षा काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. बोर्ड परीक्षेत चांगल्या यशाचा फॉर्म्युला म्हणून लातूर पॅटर्न ची चर्चा असते. आता विद्यार्थ्यांना गणित विषय तसा अवघड वाटतो. पण लातूर पॅटर्नमधील ट्रिकचा अवलंब केल्यास गणितात पैकीच्या पैकी गुण मिळू शकतात. लातूरमधील बहुतांश प्राध्यापक विद्यार्थ्यांना याच ट्रिक सुचवतात.
लातूरच्या कनिष्ठ महाविद्यालयांचा 100 टक्के निकाल लातूरमधील कनिष्ठ महाविद्यालयाची संख्या २५ पेक्षा अधिक आहे. येथील गणित विषयातील गुणवत्तेचा टक्का सुद्धा पैकीच्या पैकी असतो. दरवर्षी 100 पैकी शंभर गुण घेणाऱ्यांची संख्या शंभरी पार असते. लातूर पॅटर्न मधील गणित विषयात वापरल्या जाणाऱ्या काही पद्धती वापरून गणिताचे मार्क्स वाढवण्यास मदत होईल. Latur Pattern: फिजिक्समध्ये पैकीच्या पैकी मार्क मिळवण्याचा फॉर्म्युला काय? पाहा Video या ट्रिक्स वापरून गणितात मिळवा 100% गुण १. गणित विषयातील सर्व थेरम व प्रॉब्लेम यांचा भरपूर सराव करावा. सर्व फॉर्म्युले नीट समजून घेऊन पाठ करावेत व त्याचा वापर करून प्रॉब्लेम सोडवावेत. २. गणित या विषयासाठी प्रश्न क्रमांक ए मधील प्रश्न कंपल्सरी असल्यामुळे तो काळजीपूर्वक सोडवावा. जेणेकरून पैकीच्या पैकी गुण मिळवता येतील. ३. इतर प्रश्नांमध्ये विद्यार्थ्यांना चॉईस असतो. तेथे उपप्रश्नांची निवड करताना काळजी घ्या. ज्या प्रश्नाचे उत्तर कमी स्टेप्स मध्ये आहे व खात्रीने लिहिता येते तोच प्रश्न निवडा. आवश्यक तेवढेच प्रश्न सोडवा. शेवटी वेळ शिल्लक असेल तर जादाचे प्रश्न सोडवावेत. ४. गणित या विषयात जास्त मार्क मिळवण्यासाठी पाठ्यपुस्तकामध्ये दिलेल्या पद्धती व त्याखालील प्रश्नसंच सोडविणे महत्त्वाचे आहे. ५. पाठ्यपुस्तकातील सर्व प्रॉब्लेमची प्रॅक्टिस करा. ६. मेथड वाईज प्रॉब्लेम चा सराव करावा फॉर्म्युलाचे पाठांतर करून तो वापरून पहावा. ७. गणित विषयाच्या विविध प्रश्नपत्रिका सोडवून त्या स्वतः तपासून पाहा. त्यात घडलेल्या चुकांची पुनरावृत्ती होऊ देऊ नका. ८. महाविद्यालयात सराव परीक्षेचे पेपर हे बारावी बोर्डाच्या पेपरचा काही भाग असतो. यामुळे त्या पेपरचा सराव अधिकाधिक करावा. त्यामुळे पेपरचे स्ट्रक्चर आपल्या लक्षात येईल. या पद्धतीमुळे गणितामध्ये जास्तीत जास्त मार्क मिळवण्यास आपणास मदत होईल. या सर्व पद्धतीचा वापर लातूर पॅटर्नमध्ये प्रामुख्याने केला जातो.