JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / लातूरकर तरुणाचा असाही पॅटर्न, थेट ओला आणि उबेरला दिली टक्कर

लातूरकर तरुणाचा असाही पॅटर्न, थेट ओला आणि उबेरला दिली टक्कर

आईला वेळेत रिक्षा मिळाली नाही म्हणून लातूरच्या इंजिनिअर तरुणानं शहराचाच प्रश्न मिटवला. आता देतोय ओला आणि उबेरला टक्कर

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

लातूर, 25 जुलै: आईला रुग्णालयात जाण्यासाठी वेळेत रिक्षा मिळाली नाही. त्यामुळे लातूरमधील सॉफ्टवेअर इंजिनिअरने आपल्या एका कृतीने शहरवासियांचाच प्रश्न मिटवला. हरी व्यास यानं GoAutos नावाचं स्वतंत्र ॲप तयार केलं. त्यामुळे आता लातूरकरांना घरातूनच रिक्षा बोलावता येत आहे. विशेष म्हणजे त्याचं हे ॲप थेट ओला आणि उबेरला टक्कर देणारं आहे. कशी सुचली कल्पना हरी व्यास यांच्या आईला रुग्णालयात जाण्यासाठी आणि शहरात फिरण्यासाठी वेळत रिक्षा मिळत नव्हती. आईला रिक्षाची वाट पाहायला लागत असल्याने सॉफ्टवेअर इंजिनिअर असणाऱ्या मुलाने त्यासाठी काहीतरी करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार हरी व्यास याने घरात बसूनच रिक्षा बोलावता येऊ शकणारं मोबाईल ॲप GoAutos तयार केलं. ओला आणि उबेरप्रमाणे काम करणारं हे ॲप केवळ लातूर शहरासाठी तयार करण्यात आलं आहे.

लातूरवासियांना होणार फायदा मुंबई पुणे अशा मेट्रो शहरात ओला, उबेर सारखी टॅक्सी सुविधा मिळते. तशीच सुविधा आता लातुरमध्ये सुरू झाली आहे. लातूर शहरातील विविध ठिकाणी रिक्षाने दररोज प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. अनेक वेळा घरातून बाहेर जाताना रिक्षा वेळेवर उपलब्ध होत नाही. ही गरज लक्षात घेऊन हरी व्यास यांनी GoAutous हे ॲप तयार केले आहे. त्याचा मोठा फायदा लातूरकरांना होत आहे. E-Vehicle: तुम्हाला माहितीये स्वस्तात मस्त ई-व्हेईकल कशी बनते? आत्तापर्यंत 80 रिक्षावाल्यांचा सहभाग पुणे, मुंबईसारख्या मोठ्या शहरात ओला, उबेरच्या माध्यमातून टॅक्सी भाड्याने घेता येते. पण लातूर सारख्या छोट्या शहरात हे होणं कठीण होतं. आता GoAutous च्या माध्यमातून लोकांना शहरात फिरणे सोपे होणार आहे. यामध्ये आतापर्यंत 80 रिक्षांची नोंदणी झालेली आहे. या ॲपच्याद्वारे नोंदणीकृत करण्यात आलेले सर्व ऑटो बाबत कागदपत्रांची व चालकांची पूर्ण पडताळणी करूनच त्यांची नोंदणी करण्यात आली आहे, अशी माहिती हरी व्यास यांनी दिली. खालील लिंकवर डाउनलोड करता येईल ॲप ॲप लिंक- https://play.google.com/store/apps/details?id=com.goauto.appuser

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या