JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / गोगलगाय शेतात येते कुठून? एकदा आली की पुढच्या वर्षाचाही लावते वाट, संपूर्ण माहिती VIDEO

गोगलगाय शेतात येते कुठून? एकदा आली की पुढच्या वर्षाचाही लावते वाट, संपूर्ण माहिती VIDEO

पावासाळा सुरू झाला की गोगलगायी कुठून येतात? पाहा कशी वाढते संख्या आणि कसं करावं नियंत्रण?

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

लातूर, 19 जुलै: मराठवाड्यात इवलिशी दिसणारी गोगलगाय सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांवर मोठं संकट निर्माण करते. सोयाबीन लागवडीनंतर उगवत असतानाच फस्त करणारी गोगलगाय धोकादायक ठरते. तेव्हा योग्य वेळी तिचा बंदोबस्त करणं गरजेचं असतं. अचानक गोगलगायी येतात कुठून? त्यांची संख्या वाढते कुठून? त्यांचा बंदोबस्त करावा कसा? असे प्रश्न अनेक शेतकऱ्यांना पडलेले असतात. याबाबतच लातूरमधील सोयाबीन विशेषज्ञ डॉ. अरुण गुट्टे यांनी माहिती दिली आहे. गोगलगायींचे प्रजनन मान्सूनेच आगमन झाल्यानंतर पाऊस सुरू झाला की शेतकरी सोयाबीन पेरणीकडे वळतात. हाच काळ गोगलगायींच्या प्रजननाचा काळ आहे. सर्वसाधारणपणे ऑक्टोबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात गोगलगायी जमिनीत सुप्तावस्थेत जातात आणि जून महिन्यात चांगला पाऊस होताच त्या सुप्तावस्थेतून बाहेर येतात. जमिनीच्या वर आलेल्या गोगलगायी जुलैच्या पहिल्या पंधरवाड्यात समान आकाराच्या गोगलगायींशी संग करतात आणि जमिनीखाली प्रत्येक गोगलगाय 100 ते 150 अंडी टाकतात. जुलै महिन्याचा दुसरा पंधरवाडा हा गोगलगायीद्वारे अंडी टाकण्याचा असतो, असे डॉ. गुट्टे सांगतात.

अंडी टाकण्याअगोदरच घ्यावी काळजी जुलै महिना हा गोगलगायींचा अंडी टाकण्याचा काळ असतो. त्यामुळे सोयाबीन आणि इतर पिकांना होणारा धोका टाळण्यासाठी अंडी टाकण्याअगोदरच गोगलगायींची वाढ नियंत्रित करावी. तर चालू हंगामातील सोयाबीन पिकाबरोबरच पुढील हंगामाच्या सोयाबीनचेही संरक्षण होणार आहे. तसेच गोगलगायींचा वाढता धोका रोखता येणार आहे, असे डॉ. गुट्टे यांनी सांगितले. कसे करावे नियंत्रण? गोगलगायी सोयाबीन पिकाचे रोपावस्थेत मोठ्या प्रमाणात नुकसान करत असल्यामुळे रोपावस्थापूर्वीच गोगलगायीचे नियंत्रण करणे आवशयक आहे. सध्या सुप्तावस्थेतून बाहेर आलेल्या गोगलगायी दररोज सकाळी 6 ते 8 च्या दरम्यान बांधाच्या बाजूने आढळून येत आहेत. त्यामुळे गोगलगायींच्या प्रभावी नियंत्रणासाठी गावातील सर्व शेतकऱ्यांनी मोहीम स्वरुपात सकाळी 6 ते 8 च्या दरम्यान शेतात जाऊन जमिनीच्यावर आलेल्या गोगलगायी गोळा कराव्यात. गोळा केलेल्या गोगलगायी कुठेही न टाकून देता साबणाच्या किंवा मिठाच्या पाण्यात टाकून नष्ट कराव्यात किंवा गोळा केलेल्या गोगलगायींवर मीठ किंवा चुन्याची भुकटी टाकावी. इवलीशी गोगलगाय करले पिकांचा नाश, हा उपाय करा हाईल सुटका स्नेलकिल गोळ्यांचा वापर सुतळीचे बारदाने गुळाच्या पाण्यात भिजवून आदल्या दिवशी बांधाच्या बाजूने रॅन्डम पद्धतीने टाकावेत आणि दुसऱ्या दिवशी सकाळी बारदान्याखाली जमा झालेल्या गोगलगायी गोळा करून मिठाच्या अथवा साबणाच्या पाण्यात टाकून नष्ट कराव्यात. याशिवाय स्नेलकिलच्या छोट्या छोट्या गोळया बांधाच्या बाजूने 5 ते 7 फुट अंतरावर टाकून द्याव्यात. गोगलगायीचा प्रादुर्भाव जास्त क्षेत्रावर झाला असल्यास स्नेलकिल गोळ्याचे पावडर तयार करून पाण्याच्या मदतीने पेस्ट तयार करावी आणि अशी पेस्ट मूरमुऱ्याला लावावी व असे मुरमुरे गोगलगाय प्रादुर्भावग्रस्त क्षेत्रावर टाकावेत. स्नेलकिल हे औषध गोगलगायीना आकर्षून घेते आणि या स्नेलकिल गोळीला किंवा स्नेलकिलयुक्त मूरमुऱ्याला खाल्यानंतर 4 ते 5 तासात गोगलगायीच्या शरीरातील स्त्राव बाहेर पडून गोगलगायी नष्ट होतात. गोगलगायी गोळा करताना हातात हातमोजे घालणे आवश्यक आहे, असेही डॉ. अरुण गुट्टे सांगतात.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या