ऋषिकेश होळीकर, प्रतिनिधी लातूर, 6 मार्च: सिद्धेश्वर रत्नेश्वर मंदिर हे लातूरचे ग्रामदैवत आहे. याची निर्मिती 12 व्या शतकात राष्ट्रकूट राजांच्या कालखंडात झाली. राजा अमोघ वर्ष तिसरा यांनी मंदिराची स्थापना केली. 700 वर्षे पुरातन असणारे हे मंदिर लातूरमधील लोकांचे प्रमुख धार्मिक श्रद्धास्थान आहे. तसेच पर्यटकांचेही आकर्षण केंद्र आहे. सिद्धेश्वर रत्नेश्वर मंदिराचे बांधकाम सिद्धेश्वर रत्नेश्वर मंदिराचे बांधकाम अत्यंत मोहक व दगडी बांधकामात कोरीव स्वरूपाचे आहे. यात एकूण 52 ओसरींचा समावेश आहे. यामध्ये एक शिलालेख आहे ज्या वरती संस्कृत भाषेमध्ये लिखाण केले आहे. हा शिलालेख जवळपास सातशे वर्ष जुने असल्याचे पुरातत्त्व विभागाकडून सांगण्यात येते. मंदिराच्या डाव्या बाजूला बारावा आहे याच सप्तसुंदरीच्या मूर्ती आहेत. यामधून दक्षिणात्य संस्कृतीचे दर्शन होते.
मंदिरातवर कोरीव काम पुरातत्व विभागाकडून मंदिरावरील शिलालेखाचे वाचन करण्यात आले. तेव्हा हे शिल्प 700 वर्ष जुने असल्याचे सांगण्यात आले. या मंदिराच्या भिंतीवर अनेक कोरीव शिल्प, वेगवेगळ्या प्रकारच्या मूर्ती, हत्ती, घोडे, देव देवतांच्या मूर्ती आहेत. मंदिराच्या प्रवेशद्वारावरती तीन हत्ती कोरलेले आहेत. हत्ती हे शक्तीचे प्रतीक म्हणून ओळखले जाते. Holi 2023 : होळी दहन करण्यासाठी आहे फक्त 2 तास वेळ, पाहा काय मुहूर्त? Video लातूरचे जुने नाव रत्नापूर सिद्धेश्वर रत्नेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार इसवी सन 1910 करण्यात आला. या मंदिराबाबत इतिहासामध्ये अनेक पुरावे मिळतात. रत्नापूर महात्म्य या धर्मग्रंथांमध्ये सिद्धेश्वर रत्नेश्वर मंदिराचा दाखला दिला आहे. लातूरचे पूर्वीचे नाव रत्नापूर होते. त्यामुळे रत्नेश्वर हे लातूरचं ग्रामदैवत म्हणूनही ओळखले जाते. दरवर्षी महाशिवरात्रीला यात्रा दरवर्षी महाशिवरात्रीच्या वेळी येथे यात्रा भरते. तेव्हा सिद्धेश्वर रत्नेश्वर मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. यामध्ये लातूर, उस्मानाबाद, नांदेड, कर्नाटकचा काही भाग येथील लाखो भाविक दर्शनासाठी येत असतात. Mahashivratri 2023: सिद्धेश्वर मंदिरात गवळी समाजाला मान, काय आहे लातूरमधील परंपरा? Video गवळी समाजाला मान लातूरचे ग्रामदैवत सिद्धेश्वर रत्नेश्वर मंदिराच्या यात्रेची सुरुवात महाशिवरात्रीपासून होते. शिवरात्रीच्या आदल्या रात्री बारा वाजता संपूर्ण गवळी समाज बांधवाकडून सिद्धेश्वराला दुग्धाभिषेक करण्यात येतो. यानंतरच सिद्धेश्वराची पूजा अभिषेक केला जातो. ही प्रथा फार जुनी असून लातूर शहरातील गवळी समाजाला हा मान आहे.