विठ्ठल भाडमुखे, प्रतिनिधी
नाशिक 5 मार्च : संपूर्ण भारतभर मोठ्या उत्साहात साजरा केला जाणारा सण म्हणजेच होळी. होळी हा पवित्र सण मानला जातो. होळी हा वसंत ऋतूमध्ये साजरा केला जाणारा एक महत्वपूर्ण सण आहे. यावेळी रंगाला अनन्यसाधारण महत्व प्राप्त होते. होळी हा सण रंगांचा सण म्हणूनही ओळखला जातो. मात्र, होळी सण साजरा करण्यामागे प्रथा, परंपरा शास्त्र काय आहे ? का हा सण साजरा केला जातो ? या वर्षी कोणत्या मुहूर्तावर होळीचे पूजन करावे, या संदर्भात नाशिकचे धर्मशास्त्र अभ्यासक अनिकेत शास्त्री महाराज यांनी माहिती दिली आहे.
का केलं जात होलिका दहन?
फाल्गुन पोर्णिमा, हुताशनी पोर्णिमा, कामदहन पौर्णिमा म्हणजे होळी. विष्णुपुराणानुसार भक्त प्रल्हादाला हिरण्य कष्यपूने त्याच्या बहिणी सोबत म्हणजे होलीके सोबत मारण्याचं कट कारस्थान रचलं आणि तिला सांगितलं की कोणत्याही स्वरूपात या प्रल्हादाला तू मार, त्याचा अंत कर, त्यामुळे होलीकेने भक्त प्रल्हादाला मांडीवर घेतलं आणि धगधगत्या चित्तेमध्ये प्रवेश केला. परंतु भक्त प्रल्हाद हा भगवंताचा निस्सीम भक्त होता. विष्णू भगवंताच्या कृपेमुळे होलिकेचे दहन झालं. असुरी प्रवृत्तीचे दहन झालं. दृष्ट प्रवृत्तीचे दहन झाले आणि भक्त प्रल्हाद त्यामध्ये सुखरूप वाचला. शेकडो वर्षांची ही आख्यायिका आहे. तेंव्हापासून होलिका दहन केलं जात असल्याची माहिती धर्मशास्त्र अभ्यासक अनिकेत शास्त्री महाराज यांनी दिली आहे.
Holi 2023 : यंदा रंगपंचमीला घरीच बनवा नैसर्गिक रंग, पाहा काय आहे पद्धत? Video
या वस्तू होळीमध्ये टाकून दहन करावे
होलिका दहनामध्ये जास्तीत जास्त जडीबुटी, आयुर्वेदिक वनस्पती, नानाविध वनस्पती, राशी वनस्पतींचा पालापाचोळा, समिंधा सुगंधी द्रव्य, गायीचे शुद्ध तूप गौऱ्या टाकून, दुर्गुणांचा नाश व्हावा, सदगुणांचा विजय व्हावा, अशा पवित्र उद्देशाने आणि प्रसन्न अंतकरणाने होलिका पूजन करून वैदिक मंत्राचा उच्चार करून होलिकेचे दहन करावे.
Holi 2023: होळीला जागरणाचे महत्त्व, होलिका दहनाच्या रात्री जप व ध्यानाची परंपरा
या मुहूर्तावर होळीचे पूजन करावे
होलिका पूजनाचा मुहूर्त 6 मार्च 2023 रोजी सायंकाळी 6 वाजून 24 मिनिटे ते 8 वाजून 51मिनिटे थोडक्यात या दोन तास 27 मिनिट आहे.याच वेळी होलिका पूजनाचा मुहूर्त आहे. सूर्यास्तानंतर सर्वांनी मनोभावे होळी साजरी करावी, असंही अनिकेत शास्त्री महाराज यांनी सांगितले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.