JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / MPSC Success Story: अल्पभूधारक शेतकऱ्याची मुलगी झाली क्लास वन अधिकारी! Video

MPSC Success Story: अल्पभूधारक शेतकऱ्याची मुलगी झाली क्लास वन अधिकारी! Video

MPSC Result 2021: राज्यसेवा परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. यामध्ये अल्पभूधारक शेतकऱ्याची मुलगी ज्ञानेश्वरी तोळमारे हिने यश मिळवले आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

ऋषिकेश होळीकर, प्रतिनिधी लातूर, 3 मार्च: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या राज्यसेवा परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. यात लातूर जिल्ह्यातील टाका या गावातील अल्पधूधारक शेतकऱ्याच्या मुलीने यश मिळवले आहे. ज्ञानेश्वरी तोळमारे हिने मुलींमध्ये राज्यात पंधरावा क्रमांक पटकावला. तिच्या या यशाबद्दल जिल्ह्यातील सर्व स्तरातून तिचे अभिनंदन केले जाते आहे. वडील अल्पभूधारक शेतकरी ज्ञानेश्वरी तोळमारे हिचे वडील अल्पभूधारक शेतकरी आहेत. तर आई गृहिणी आहे. घरची परिस्थिती बेताची असतानाही त्यांनी मुलीला शिक्षण दिले. ज्ञानेश्वरीचे प्राथमिक ते माध्यमिक शिक्षण टाका येथील शाळेतच झाले. त्यानंतर महाविद्यालयीन शिक्षणासाठी दयानंद महाविद्यालय लातूर येथे प्रवेश घेतला व तेथूनच एमपीएससीची आवड जडली. या यशानंतर आई-वडिलांचा पाठीवर कायमच हात होता अशी भावना ज्ञानेश्वरीने व्यक्त केली.

तिसऱ्या प्रयत्नात यश लातूरमध्ये स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरू केला. ज्ञानेश्वरीला तिसऱ्या प्रयत्नात यश मिळाले. समाजासाठी काहीतरी करावे असे ठरवून अभ्यासाला सुरुवात केली. आमच्या शिक्षणासाठी आई-वडिलांनी आयुष्य वेचले आहे यामुळे याची उपरती म्हणून मनोभावे प्रयत्न केला व आज राज्यात मुलींमध्ये पंधरावे स्थान मिळाले असे ज्ञानेश्वरी यांनी सांगितले. MPSC Success Story : प्राथमिक शिक्षकाचा मुलगा राज्यात दुसरा! कोल्हापूरच्या शुभमच्या यशाचं पाहा रहस्य, Video कोरोना काळात अडचणी कोरोना काळात अभ्यास करते वेळी मार्गदर्शन मिळत नव्हते. त्यामुळे भरपूर अडचणींचा सामना करावा लागला. पण सेल्फ स्टडी करून शंकांचे निरसन स्वतःहून करून घेतलं. याचा फायदा झाल्याचं ज्ञानेश्वरी सांगतात. Success Story: ‘ती’ रिस्क ठरली निर्णायक, टेम्पो चालकाचा मुलगा MPSC परीक्षेत राज्यात पहिला! Video ग्रामीण मुलींसाठी काम करायचंय अधिकारी झाल्यानंतर प्रामुख्याने ग्रामीण मुलींच्या स्त्रियांच्या सक्षमीकरणासाठी काम करण्याची इच्छा आहे. त्याचबरोबर जे पद मिळेल त्याचे काम प्रामाणिकपणे करून राज्याच्या व देशाच्या उन्नतीत योगदान द्यायचे आहे, अशी भावना ज्ञानेश्वरी यांनी व्यक्त केली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या