JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Kolhapur SSC Result : ज्यांनी हिणवलं त्यांनीच काढली उंटावरुन मिरवणूक; कोल्हापुरातील पठ्ठ्याने करुन दाखवलं

Kolhapur SSC Result : ज्यांनी हिणवलं त्यांनीच काढली उंटावरुन मिरवणूक; कोल्हापुरातील पठ्ठ्याने करुन दाखवलं

Kolhapur SSC Result : कोल्हापूरात 10 वी पास झालेल्या एका विद्यार्थ्याची थेट उंटावरुन मिरवणूक काढण्यात आली आहे. विशेष म्हणजे ज्यांनी तू पास होणार नाही, असं चिडवलं त्यांनी ही मिरवणूक काढली आहे.

जाहिरात

समर्थ जाधव

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

कोल्हापूर, 2 जून : राज्यातील इयत्ता 10 वीचा निकाल आज जाहीर झाला आहे. आपल्या आयुष्याला पहिला वळण देणारा काळ म्हणजे दहावीची परीक्षा. त्यामुळे या निकालाची उत्सुकता सर्वांनाच असते. निकालानंतर अनेकजण याचं धुमधडाक्यात सेलिब्रेशन करतात. कोल्हापुरातील एका पठ्ठ्याने चक्क उंटावरून मिरवणूक काढली. या मिरवणुकीची चर्चा सध्या संपूर्ण कोल्हापुरात होत असून समर्थ सागर जाधव असे विद्यार्थ्यांचे नाव आहे. समर्थला तू पास होणार नाही म्हणून वर्षभर त्यांनी चिडवलं, त्याच मित्रांनी समर्थ पास झाल्यानंतर त्याची उंटावर बसून मिरवणूक काढली आहे.

संबंधित बातम्या

समर्थ सागर जाधव असे या मुलाचे नाव असून तो कोल्हापुरातील एस एम लोहिया या हायस्कूलमध्ये इयत्ता दहावीमध्ये शिकत होता. शाळेत अभ्यासात कमी आणि दंगा घालण्यात एक नंबर असलेला मुलगा. यामुळे शाळेतील अनेक मित्र त्याला “तू पास होणार नाही”, असे वर्षभर चिडवत होते. मात्र, पठ्ठ्याने अभ्यास करत दहावीच्या परीक्षेत तब्बल 51 टक्के गुण घेत पास झाला. यामुळे जे मित्र तू पास होणार नाही, असं म्हणत होते. त्याच मित्रांनी त्याला उंटावर बसवून कोल्हापुरच्या गंगावेश परिसरातून त्याची मिरवणूक काढली. तर गुलालाची उधळण करत आणि वाजत गाजत पेढे भरवत मिरवणूक काढल्याने या मिरवणुकीची चर्चा सध्या संपूर्ण कोल्हापुरात होत आहे. वाचा - Maharashtra SSC Result 2023 Live updates : पास की नापास? रोल नंबर इथं टाका आणि पाहा दहावीचा निकाल 10वी नंतर करिअरच्या संधी दहावीतल्या मार्क्सवर करिअरची दिशा ठरत असते. दहावीच्या परीक्षेचा निकाल लागला, की पुढे नेमक्या कोणत्या शाखेत प्रवेश घ्यायचा, शिक्षणाची दिशा कशी ठेवायची असे प्रश्न विद्यार्थ्यांच्या मनात असतात. दहावीनंतर कोणत्या शाखेला प्रवेश घ्यायचा, तांत्रिक शिक्षण घ्यायचं की पारंपरिक, याविषयीदेखील विद्यार्थ्यांच्या मनात संभ्रम असतो. खरं तर दहावीनंतर पुढच्या शिक्षणाचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. दहावी उत्तीर्ण झालेले बहुतांश विद्यार्थी इयत्ता बारावी करणार असं उत्तर देतात. खरं तर दहावी झाल्यावर शिक्षणाचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. ज्या विद्यार्थ्यांना बारावी करायची आहे, त्यांच्यासाठीदेखील काही पर्याय आहेत. काही विद्यार्थ्यांना दहावीनंतर शिक्षण आणि नोकरी अशा दोन्ही गोष्टी साध्य करायच्या असतात. असे विद्यार्थी दूरस्थ शिक्षणाचा पर्याय निवडू शकता. यात तुम्ही नोकरी करून शिक्षण घेऊ शकता.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या