JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / मुंबई महापालिका स्वतंत्र लढविणार, कोल्हापुरात राज ठाकरेंचा एल्गार; सीमावादाच्या मुद्द्यावरही विरोधकांना घेरलं

मुंबई महापालिका स्वतंत्र लढविणार, कोल्हापुरात राज ठाकरेंचा एल्गार; सीमावादाच्या मुद्द्यावरही विरोधकांना घेरलं

कोकण दौऱ्याआधी आज राज ठाकरे कोल्हापुरात बोलत होते.

जाहिरात

file photo

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

कोल्हापूर, 29 नोव्हेंबर : मनसे अध्यक्ष राज ठाकरे उद्यापासून कोकण दौऱ्यावर आहेत. याआधी आज त्यांनी कोल्हापुरात पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी मुंबई महापालिका स्वतंत्र लढणार, असे सांगितले. काय म्हणाले राज ठाकरे - राजकीय पक्षांवर शिंतोडे उडवले गेले. त्यामुळे ज्यांना आमची ताकद बोचते, ते आरोप करतात. मी कुणासाठीच काम करत नाही. मी फक्त माझ्या पक्षासाठी महाराष्ट्रासाठी काम करतो, असे भाजपसोबतच्या प्रश्नावर त्यांनी प्रतिक्रिया दिली. पक्षात अनेक अंतर्गत बदल होतील. आगामी निवडणुकीची ही तयारी समजा. कोणताही लढा हा प्रस्थापितांविरोधातच असतो. बालेकिल्ले हलतात. यापुढेही हलतील, असेही त्यांनी कोकण दौऱ्याआधी आज राज ठाकरे कोल्हापुरात बोलत होते. मुंबई महापालिका स्वतंत्र लढणार, असे यावेळी त्यांनी सांगितले. अंबाबाई देवीच्या दर्शनाने कोकणच्या दौऱ्याला सुरुवात करणार आहे. तसेच आज चांगला तांबडा, पांढरा रस्सा खाणार आहे. कोकणच्या दौऱ्याबाबत बरेच दिवस सुरू होते. तर उद्यापासू कोकण दौऱ्याला सुरुवात करणार आहे. तसेच कोकण संपल्यानंतर पश्चिम महाराष्ट्र दौरा करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. आगामी निवडणुकीची ही तयारी समजा. उत्साही लढा हा प्रस्थापितांच्या विरोधात असतो. यापूर्वी मला यामध्ये यश आले आहे. बालेकिलले हलत असतात. यानंतरही हलतील, असे आव्हान त्यांनी विरोधकांना देत मुंबई महापालिका स्वतंत्र लढणार असल्याचे जाहिर केले. हेही वाचा -  उद्धव ठाकरे-प्रकाश आंबेडकर युतीवर मोठी अपडेट; वंचितची अधिकृत भूमिका जाहीर माझ्या सोबत आलेली लोक सगळी नवीन होती. राष्ट्रवादी स्थापन झाली त्यावेळी एक गट बाहेर पडला होता. पक्षाला माझ्या 16 वर्षे झाली आहेत. भाजपचा जन्म 52 वर्षांपूर्वी झाला. शिवसेनेला 1966 नंतर 1985 साल उजडावे लागले मुंबई पालिका हाती घ्यायला. त्यामुळे प्रत्येक गोष्टीला वेळ जातो, असेही ते यावेळी म्हणाले. सीमावादावर राज ठाकरे काय म्हणाले? मागील काही दिवसात महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाचा मुद्दा पुन्हा समोर आला आहे. यावरही राज ठाकरे यांनी भाष्य केले. ते म्हणाले, सीमावादमध्येच कोठून वर येते हे समजत नाही. लक्ष वळवण्यासाठी हा प्रश्न वर येतो का, सीमावाद हा न्याय प्रविष्ट आहे. मग अचानक हा वाद कोठून येतो, असा प्रश्नही त्यांनी विचारला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या