कोल्हापुरात पुन्हा दगडफेक
कोल्हापूर, 08 जून : कोल्हापुरात आक्षेपार्ह पोस्टप्रकरणी हिंदुत्ववादी संघटनांकडून बुधवारी आंदोलन करण्यात आलं होतं. या आंदोलनाला हिंसक वळण लागल्यानंतर शहरासह जिल्ह्यातील इंटरनेट बंद करण्यात आलं. यानंतर जिल्ह्यात तणावपूर्ण शांतता आहे. दरम्यान, कोल्हापुरात रात्री पुन्हा दगडफेकीची घटना घडली. वडनगेत वाहनाची तोडफोड करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. तर संशयिताच्या घरावर मध्यरात्री दगडफेक कऱण्यात आली आहे. शहरात सकाळी शांततेचं वातावरण होतं. तणावाची परिस्थिती असली तरी आता हळूहळू सर्व पूर्वपदावर येताना दिसतंय. खबरदारी म्हणून शहरात पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये आणि शांतता पाळावी असं आवाहन पोलीस आणि प्रशासनाने केलं आहे. Crime News: मुंबईत प्रियकराकडून सरस्वती वैद्यच्या शरीराचे तुकडे, कुकरमध्ये शिजवत मिक्सरमध्ये फिरवलं मांस कोल्हापुरात शिवाजी चौकात हिंदुत्त्ववाद्यांकडून आंदोलन करण्यात आलं होतं. यावेळी पोलीस आणि आंदोलकांमध्ये वादावादी झाली. तेव्हा दगडफेकीची घटना घडली होती. यात काही वाहनांचे आणि घरांचेही नुकसान झाले. पोलिसांनी जमाव पांगवण्यासाटी लाठीमारही केला. अफवा पसरू नयेत यासाठी प्रशासनाने गुरुवारी मध्यरात्रीपर्यंत इंटरनेट बंद केलं होतं. अहमदनगर : औरंगजेबाच्या स्टेटसवरून मिरजगावमध्ये तणाव अहमदनगर - आक्षेपहार्य पोस्ट टाकल्या प्रकरणे कर्जत तालुक्यातील मिरजगाव मध्ये तणाव निर्माण झाला होता पोलिसांनी वेळच घटनास्थळी जाऊन परिस्थिती नियंत्रणात आणली आहे, या प्रकरणांमध्ये पोलिसांनी एक आरोपीला अटक केली असून एक संशयित आरोपीची चौकशी सुरू आहे या प्रकरणी आज मिरजगाव बंदची हाक देण्यात आले आहे पोलिसांनीही मोठा बंदोबस्त ठेवला असून परिस्थिती नियंत्रणामध्ये आहे.