JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व शाळा उद्या होणार सुरु, पाहा आणखी काय होणार बदल

कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व शाळा उद्या होणार सुरु, पाहा आणखी काय होणार बदल

कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व शाळा उद्या होणार सुरु होणार आहेत. आणखी काय बदल होणार पाहा.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

कोल्हापूर 27 जुलै : कोल्हापुरातील पंचगंगा नदीने पाणीपातळी वाढल्यानंतर पात्राबाहेर पडायला सुरुवात केली. हळूहळू एकेक रस्ते बंद होत केले आणि कोल्हापूर गगनबावडा मार्गावर असणारा बालिंगा फुल देखील धोकादायक असल्याचे सांगत प्रशासनाकडून वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. मात्र पालकमंत्री दीपक केसरकर यांनी कोल्हापूरचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या समवेत झालेल्या बैठकीत हा पूल वाहतुकीस पुन्हा सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. त्याचबरोबर  कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व शाळा उद्या होणार सुरु होणार असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले आहे. वाहनधारकांना त्रास बालिंगा पूल हा कोल्हापुरातील पन्हाळा करवीर शाहूवाडी राधानगरी आधी तालुक्यातील नागरिकांसाठी, त्याचबरोबर हाच रस्ता पुढे कोकणात जात असल्याने एक महत्त्वाचा मार्ग आहे. अचानकपणे हा पूल बंद केल्यानंतर नागरिकांमध्ये प्रचंड गोंधळ निर्माण झाला होता विद्यार्थी नोकरदार वर्ग यांना आपल्या इच्छित स्थळी जाण्यासाठी लांबचा पल्ला गाठून पर्यायी मार्गाने यावे लागत होते. त्यामुळे हा पूल वाहतुकीस खुला करावा अशी नागरिकांमधून मागणी होत होती.

अखेर पुल सुरू आज पालकमंत्री कोल्हापूर दौऱ्यावर आले असता माजी आमदार चंद्रदीप नरके यांनीही केसरकर यांच्याशी या बालिंगा पुलाविषयी फोनवरून चर्चा करत पुल वाहतुकीस सुरू करण्याची विनंती केली होती. त्यानंतर पालकमंत्र्यांनी बालिंगा पुलावरून वाहतूक सुरू करण्याबाबत जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांना सूचना केल्या. अशा प्रकारे होईल वाहतूक खरंतर बालिंगापूर हा वाहतुकीसाठी सुरू करण्यात आला असला तरी नदीचे पाणी पुलाला घासून वाहत आहे त्यामुळे तो धोकादायक अवस्थेत आहे. त्यामुळे अनुचित प्रकार टाळण्यासाठी खबरदारी म्हणून फक्त हलक्या आणि दुचाकी वाहनांनाच बालिंगा पुलावरून वाहतूक सुरू ठेवण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना सूचना केल्या आहेत. त्यामुळे पुलाच्या परिसरात लावण्यात आलेली बॅरिकेट्स हटवून वाहतूक सुरू झाली आहे.

मुसळधार पाऊस अन् पाण्याचा पडला वेढा, तान्हुल्या बाळासह 16 जण रात्रभर जीव मुठीत घेऊन बसले, अखेर..Video

संबंधित बातम्या

अजून काय काय घेतले निर्णय संभाव्य पूर परिस्थितीचा आढावा घेऊन मग बैठकीत दीपक केसरकर यांनी शाळा आणि स्थलांतरीत नागरिक यांच्या बाबतही निर्णय घेतला आहे. हवामान खात्याने कोल्हापुरातील पावसाचा जोर कमी होणार असा अंदाज दिला आहे. त्याचबरोबर पाऊस कमी झाला असलातरी पंचगंगा नदीची पाणी पातळीही धरणातून पाणी सोडल्यामुळे एक एक इंच वाढत आहे. त्यामुळे सतर्कता बाळगत सुट्टी देण्यात आलेल्या जिल्ह्यातील सर्व शाळा उद्या दिनांक 28 जुलै पासून पूर्ववत सुरू होतील. पूर भागातून स्थलांतरित झालेल्या नागरिकांना दिनांक 28 जुलै सकाळपासून घरी जाण्यास सांगितले आहे. त्याचबरोबर ज्या मुलांच्या परीक्षा सुरू आहेत, त्यांच्यासाठी परीक्षेची पुढची तारीखही देण्यात येईल. त्यामुळे गोंधळून जाऊ नये असे पालकमंत्र्यांनी सांगितले आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या