JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / पंचगंगा नदी धोक्याच्या पातळीकडे, पूरबाधित नागरिकांना हायअलर्ट, Video

पंचगंगा नदी धोक्याच्या पातळीकडे, पूरबाधित नागरिकांना हायअलर्ट, Video

कोल्हापूरच्या पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत मोठ्या प्रमाणात वाढ होताना पाहायला मिळत आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

कोल्हापूर, 25 जुलै : कोल्हापूरच्या पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत मोठ्या प्रमाणात वाढ होताना पाहायला मिळत आहे. कोल्हापूर जिल्ह्याला दिनांक 27 जुलै पर्यंत ऑरेंज अलर्ट देखील देण्यात आला आहे. तर संभाव्य पूर परिस्थिती पाहता कोल्हापुरातील चिखली आणि आंबेवाडी या गावातील लोकांनी स्थलांतर करायला सुरुवात देखील केलेली आहे. तसेच जिल्हा प्रशासनाने सर्व ग्रामीण आणि शहरी पूरबाधित क्षेत्रातील नागरिकांना 25 जुलै रोजी स्थलांतर करण्यासाठी सामान बांधून तयार राहण्याच्या सूचना केलेल्या आहेत. दरवर्षी पावसाळ्यात पंचगंगा नदीची पाणी पातळी वाढू लागली की कोल्हापुरातील आंबेवाडी आणि चिखली या गावातील ग्रामस्थांच्या मनात एकाच गोष्टींची भीती वाढू लागते. ती म्हणजे आपल्या गावात पाणी शिरून घर पाण्यात बुडण्याची. या गावांना दरवर्षी पुराचा फटका बसत असतो. त्यामुळे गावातील नागरिकांना स्थलांतर करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाने या आधीच दिलेल्या आहेत. तर पाणी पातळी वाढली नसल्याने बऱ्याच जणांनी स्थलांतर केले नव्हते. दरम्यान सध्या पावसामुळे पंचगंगा नदीचे 39 फुटांची इशारा पातळी ओलांडली असून नदीची धोका पातळीकडे वाटचाल सुरू झाली. त्यामुळे जिल्ह्यातील नदीकाठच्या गावांना स्थलांतरित करण्यात येत आहे.

दरवर्षीच्या संकटामुळे त्रस्त नागरिक दरवर्षी गावातील घरादारात पाणी येत असते. 2005, 2019, 2021 या वर्षांमध्ये तर पावसाने कहर केल्याने महापूर आला होता. यावेळी चिखली आणि आंबेवाडी गावात मोठ्या प्रमणावर नुकसान नागरिकांना सहन करावे लागले होते. यंदा देखील घरात पाणी शिरते की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली असल्यामुळे पुन्हा एकदा चिखली आणि आंबेवाडीतील नागरिक चिंताग्रस्त झालेत. गावातील बऱ्याच घरांची मागील महापुरात पडझड झालेली आहे. तर आपल्या हसत्या खेळत्या संसारावर पुन्हा पाणी फरले जाऊ नये, म्हणून बऱ्याच जणांनी आपले स्थलांतर केले आहे. स्थलांतरीत नागरिकांसाठी निवाराकेंद्रे ग्रामपंचायत आणि जिल्हा प्रशासन यांनी देखील स्थलांतरीत नागरीकांना कोल्हापूर शहरात वाहने पार्किंग करण्यासाठी, जनावरांसाठी जागा निश्चित केलेल्या आहेत. तर नागरिकांसाठी निवाराकेंद्रे / मदत शिबिरांच्या ठिकाणी सर्व सोय केलेली आहे.

राज्यात एकीकडे मुसळधार पाऊस, पण मराठवाड्यात भयावह परिस्थिती, Video

संबंधित बातम्या

सूचना मिळताच लगेच स्थलांतर करावे कोल्हापुरातील राजाराम बंधारा या ठिकाणी पंचगंगा नदीने धोकापातळी ओलांडल्यानंतर अर्थात 43 फूट पाणीपातळी झाल्यानंतर चिखली, आंबेवाडी गावातील सर्वांना स्थलांतर करावेच लागते. मात्र 2019 आणि 2021 च्या पुरात 52 फूट पाण्याची पातळी गाठल्यावर बाधित झालेल्या सर्वांनीच 25 जुलैला स्थलांतर करण्यास तयार रहावे. प्रशासनाकडून सूचना मिळताच कोल्हापूर शहर आणि ग्रामीण भागातील नागरिकांनी मदत शिबिरांसाठी/निवारागृहात स्थलांतरीत होण्यासाठी आपली घरे सोडावीत, असे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी सांगितले आहे. राधानगरी 100 टक्केच्या उंबरठ्यावर पंचगंगा नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ होऊ लागली आहे. राधानगरी धरण देखील 94 टक्के  पेक्षा जास्त भरले आहे. तर धरण 100 टक्के भरून स्वयंचलित दरवाजातून लवकरच पाण्याचा विसर्ग सुरू होऊ शकतो. त्यामुळे कोल्हापूर जिल्हा प्रशासन आता अलर्ट मोडवर आहे. जिल्ह्यात एनडीआरएफची एक तुकडी आधीच तैनात केली आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीने सर्वतोपरी जिल्ह्यात खबरदारी घेतली जात आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या