JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / कोल्हापुरात पावसाचा कहर, पुढील दोन दिवस यलो अलर्ट, यंत्रणा झाली सज्ज

कोल्हापुरात पावसाचा कहर, पुढील दोन दिवस यलो अलर्ट, यंत्रणा झाली सज्ज

कोल्हापूर जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. पुढील दोन दिवस यलो अलर्ट जाहीर करण्यात आला आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

कोल्हापूर, 19 जुलै : मागच्या काही दिवसात दडी मारून बसलेल्या पावसाने आता राज्यभरात जोर धरला आहे. राज्यातील विविध जिल्ह्यात अतिवृष्टी सदृश्य पाऊस कोसळत असून कोल्हापुरात ही पावसाची मुसळधार सुरू झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यात अनेक ठिकाणी नदी, नाले आणि ओढे यांच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. बऱ्याच ठिकाणी बंधाऱ्यावर पाणी आल्यामुळे त्या ठिकाणची वाहतूक बंद झाली आहे. गेल्या दोन दिवसांपासून कोल्हापूर जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. त्यामुळे कोल्हापूरच्या घाटमाथ्यासह धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस पडत आहे. तर गगनबावडा, राधानगरी, आजरा आणि शाहूवाडी या तालुक्यांतील अनेक भागात अतिवृष्टी सदृश्य पाऊस पडत आहे.

या पावसामुळे कोल्हापूरची जीवन दायीनी असलेल्या पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत देखील कमालीची वाढ झालेली पाहायला मिळत आहे. 19 जुलै, दुपारी 3.00 वाजेपर्यंत कोल्हापूरच्या राजाराम बंधाऱ्यावर नदीची पाणी पातळी 24 फूट 10 इंच (537.60m) इतकी होती. तर जिल्ह्यात एकूण 35 बंधारे पाण्याखाली गेलेले आहेत. दरम्यान पंचगंगा नदीची पंचगंगा नदीची इशारा पातळी - 39 फूट 00 इंच आणि धोका पातळी 43 फूट 00 इंच इतकी आहे. राधानगरी धरणात 50 टक्के पेक्षा जास्त पाणीसाठा कोल्हापूर जिल्ह्यासाठी वरदान असणाऱ्या राधानगरी धरणाची पाणी पातळी देखील सततच्या पावसामुळे वाढू लागली आहे. सध्या धरणात 58 टक्के पेक्षा जास्त पाणीसाठा झाला आहे. धरणातून भोगावती नदी पात्रात 700 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे. आपत्ती व्यवस्थापन कक्षाशी संपर्क साधण्याचे आवाहन कोल्हापूर जिल्ह्यासाठी हवामान खात्याकडून 19 जुलैसाठी ऑरेंज अलर्ट तर 20 आणि 21 जुलैसाठी यलो अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासन सतर्क झाले आहे. याआधीच खबरदारी म्हणून एनडीआरएफची एक तुकडी कोल्हापुरात दाखल झाली आहे. तर आपत्कालीन परिस्थितीत जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाशी संपर्क साधण्यासाठी 1077 हा टोल फ्री नंबर आणि 0231-2659232, 2652950, 2652953, 2652954 हे दूरध्वनी क्रमांक जारी करण्यात आले आहेत. आपत्कालीन स्थितीमध्ये नागरिकांनी यावर संपर्क साधण्याचे आवाहनही जिल्हाधिकारी कार्यालयाकडून करण्यात आले आहे.

कल्याण-बदलापूर महामार्ग ठप्प, मुसळधार पावसामुळे सर्वांचे हाल, धक्कादायक Video

संबंधित बातम्या

कोल्हापूर शहरातील आपत्कालीन कक्ष त्याच बरोबर कोल्हापूर शहर परिसरात काही आपत्ती उद्‌भवल्यास शहर वासियांसाठी देखील 6 आपत्ती व्यवस्थापन कक्ष कार्यरत असणार आहेत. त्यामुळे शहर परिसरातील नागरिकांनी देखील आपत्ती जनक स्थितीत या कक्षांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. • मुख्य आपती व्यवस्थापन कक्ष (महापालिका इमारत) 0231-2541188, 8956412103 • अग्रिशमन दल मुख्य नियंत्रण कक्ष (सासने मैदान ) 101, 0231-2537221, 8956412102 • गांधी मैदान विभागीय कार्यालय 0231-2622262 • छत्रपती शिवाजी मार्केट कार्यालय 0231-2543844 • राजारामपुरी विभागीय कार्यालय 0231-2521615 • छत्रपती ताराराणी मार्केट कार्यालय 0231-2530011

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या