कोल्हापूर, 28 नोव्हेंबर : कतारमध्ये सुरू असलेल्या
फुटबॉल वर्ल्ड कपच्या
निमित्तानं कोल्हापूरकरांना त्यांच्या आवडीच्या खेळावरील प्रेम व्यक्त करण्याची संधी मिळाली आहे.
कोल्हापूर
सध्या फुटबॉलमय झालं आहे. शहरामध्ये जिकडं पाहू तिकडं फुटबॉलपटूंचे बॅनर कट आउट त्याचबरोबर वेगवेगळ्या देशाचे झेंडे आणि पताके दिसतात. कोल्हापूरच्या एका सलूनमध्येही सध्या फक्त फुटबॉल वर्ल्ड कपची हवा आहे. फुटबॉलपटूचं सलून कोल्हापूरचा प्रदीप टीपुगडे हा बालगोपाल तालीम मंडळाचा फुटबॉलपटू होता. त्याने काही वर्षांपूर्वी फुटबॉलपासून दूर होत आपले हेअर पार्लर सुरू केले. प्रदीप आता फुटबॉल खेळत नसला तरी त्याचं या खेळावरील प्रेम कमी झालेलं नाही. त्यामुळेच त्याने यंदाच्या फिफा वर्ल्ड कपच्या मुहुर्तावर आपल्या दुकानाचा परिसर फुटबॉलमय बनवून टाकला. कोल्हापुरातील मिरजकर तिकटी या परिसरात प्रदिपचं सलून आहे. फिफा वर्ल्ड कपमध्ये सहभागी झालेल्या सर्व संघांचे झेंडे, त्याचबरोबर कोल्हापुरात असणाऱ्या तालीमी आणि मंडळाच्या संघांचे झेंडे पताका स्वरूपात लावलेले आहेत. इतकंच नाही तर त्यानं सलूनमध्ये फिफा वर्ल्ड कपच्या ट्रॉफीची प्रतिकृती बनवून ठेवली आहे.
Video : रांगड्या कोल्हापूरवर चढला फुटबॉलचा फिव्हर, संपूर्ण शहरात वर्ल्ड कपची हवा
सलूनमध्ये टीव्हीवर मॅच सुरू असते. त्या मॅचमध्ये खेळाडूंचे नवनवीन हेअर कट बघून ग्राहक तशा हेअर कटची मागणी करतात. बरेचसे युवक हे वर्ल्ड कप मुहुर्तावर फुटबॉल स्पेशल हेअर कट करण्यासाठी सलूनमध्ये येत असतात, असे प्रदीप यांनी सांगितले. वेगळीच चुरस.. सलूनमध्ये येणारे युवक हे वेगवेगळ्या संघांना सपोर्ट करत असतात. त्यामुळे जेव्हा टीव्ही स्क्रीनवर मॅच सुरू असते, तेव्हा बघण्यासारखे दृश्य असते. प्रत्येक जण आपल्या टीमला सपोर्ट करण्यासाठी प्रयत्न करत असतो. त्यामध्ये बऱ्याच वेळा आपापसात वाद, आनंद, निराशा, उत्साह या सगळ्याच भावना बघायला मिळतात, असे देखील प्रदीप यांनी सांगितले आहे.
ब्राझील, अर्जेंटीना की जर्मनी? कोल्हापूरकरांसाठी कोणती टीम आहे ‘लय भारी, पाहा Video
रात्रभर सजावट प्रदीप टिपुगडे यांनी दुकानाच्या दारात फुटबॉल संघाच्या पताकांची सजावट केली आहे. ही सजावट करताना कोणालाही त्रास होऊ नये म्हणून त्यांनी रात्रीची वेळ निवडली. रात्री आजूबाजूची दुकाने बंद झाल्यानंतर अकरा वाजल्यापासून त्यांनी ही सजावट केली आहे.
गुगल मॅपवरून साभार
कुठे केली आहे सजावट? अनिल्स जेंट्स हेअर पार्लर ईगल प्राईड, मिरजकर तिकटी, कोल्हापूर - 416002