JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / कोल्हापुरात राडा, ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी धैर्यशील मानेंची गाडी अडवली

कोल्हापुरात राडा, ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी धैर्यशील मानेंची गाडी अडवली

कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले लोकसभा मतदार संघाचे खासदार धैर्यशील माने यांचे वाहन ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी अडवल्यात आली.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

कोल्हापूर, 08 मार्च : कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले लोकसभा मतदार संघाचे खासदार धैर्यशील माने यांचे वाहन ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी अडवल्यात आली. दरम्यान हा प्रकार हातकणंगले तालुक्यातील इचलकरंजी शहरालगत असलेल्या चंदूर या गावात घडला. खासदार माने चंदूर येथे एका कार्यक्रमासाठी जात होते. यावेळी ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी आक्रमक होत शिंदे गटाचे खासदार धैर्यशील माने यांची गाडी अडवली.

यावेळी शिवसैनिकांनी आक्रमक होत जोरदार घोषणाबाजी करत तुम्ही का गद्दारी केली. याचा थेट जाब विचारला. यावेळी ठाकरे गट आणि शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये हमरी तुमरी झाली. ही घटना आज (दि.08) बुधवारी घडली.

आताची सर्वात मोठी बातमी, आमदार बच्चू कडू यांना 2 वर्षांची शिक्षा

संबंधित बातम्या

दरम्यान याबाबत पोलिसांना माहिती मिळताच पोलिसांनी दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांना बाजूला केले. कार्यकर्त्यांना बाजूला करीत शांत केल्यानंतर माने यांची गाडी मार्गस्थ झाली. माने यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात गेल्यापासून कडवट शिवसैनिकांमध्ये प्रचंड नाराजी आहे. यातूनच चंदूरमध्ये त्यांची गाडी अडवून काही शिवसैनिकांनी जाब विचारात संताप व्यक्त केला.

संजय राऊतांची मानेंवर सडकून टीका

मागच्या दोन दिवसांपासून खासदार संजय राऊत कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. दरम्यान संजय राऊत यांनी कोल्हापूर दौऱ्यावर आल्यानंतर विधानसभेवरून केलेल्या वक्तव्यावरून राज्यातील वातावरण जोरदार तापले होते. दरम्यान त्यांनी मागच्या दोन दिवसांत कोल्हापूर जिल्ह्यातील प्रमुख शहरात सभा घेतल्या यामध्ये त्यांनी ठाकरे गटातून फुटलेल्या दोन खासदार आणि आमदारांचा चांगलाच समाचार घेतला. दरम्यान राऊत यांनी धैर्यशील माने यांच्यावर जोरदार टीका केली. गद्दार खासदार म्हणत त्यांनी इचलकरंजी येथे माने यांना थेट आव्हान दिले.

जाहिरात
MIM नंतर राष्ट्रवादीलाही छ.संभाजीनगर नावाचं वावडं, एकाच वेळी शेकडो कार्यकर्ते देणार राजीनामा

यावेळी खासदार संजय राऊत म्हणाले की, धैर्यशील मानेंनी ‘मीच खासदार’ टॅगलाईन बदलून आता ‘मीच गद्दार’ करावी, “यांचे नाव धैर्यशील कोण ठेवले? यांना कोठेच धैर्य नसतो. कदाचित त्यांना भाजपही तिकीट देणार नाही. खोकेपटूंमधील हाही मोठा खेळाडू आहे असे खात्रीलायकरित्या समजले आहे.

जाहिरात

जनभावना बघता त्यांना बाहेरही फिरता येणार नाही, अशा गद्दारांना तुम्हीच योग्य तो धडा शिकवा. इचलकरंजीमधील घोरपडे नाट्यगृहात शिवगर्जना मेळावा पार पडला. यावेळी त्यांनी शिंदे फडणवीस सरकारचाही संजय राऊत यांनी चांगलाच समाचार घेतला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या