JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / पृथ्वीराज चव्हाण यांच्या पत्नीला पोलिसांनी घेतलं ताब्यात

पृथ्वीराज चव्हाण यांच्या पत्नीला पोलिसांनी घेतलं ताब्यात

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांच्या पत्नी सत्वशिला चव्हाण (Satvashila Chavan) यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

कराड, 6 फेब्रुवारी : केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात मागच्या अडीच महिन्यांपासून दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांचं आंदोलन (Farmers Protest) सुरू आहे.  या आंदोलनाला पाठिंबा म्हणून आज देशभरात विरोधकांकडून चक्काजाम आंदोलन (Chakkajam Andolan) सुरू आहे. कराडमध्ये माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांच्या पत्नी सत्वशिला चव्हाण (SatvaShila Chavan) यादेखील आंदोलनात सहभागी झाल्या होत्या. यावेळी त्यांनी माध्यमांशी बोलताना केंद्र सरकार व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेवर टीका केली. ‘आज शेतकरी रस्तावर उतरला असताना पंतप्रधान आणि अधिकारी वातानुकुलीत कार्यालयात बसून शेतकरी यांची चेष्टा करत आहेत. जर देशाचा पंतप्रधान शेतकरी असते तर त्यांना शेतकरी यांची बाजू पटली असती. पंतप्रधान मोदींना शेतातील काय कळते?’ असा सवाल सत्वशिला चव्हाण यांनी विचारला. कराडमधल्या या चक्काजाम आंदोलनाच्या ठिकाणी मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. यावेळी पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतलं, यामध्ये सत्वशिला चव्हाण यांचाही समावेश होता.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या