JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Jalna Accident : वडिलांसोबत खरेदीसाठी जाताना घडलं भयानक; तीन चिमुकल्यांनी जागेवरच सोडला प्राण

Jalna Accident : वडिलांसोबत खरेदीसाठी जाताना घडलं भयानक; तीन चिमुकल्यांनी जागेवरच सोडला प्राण

Jalna Accident : वडिलांसोबत खरेदीसाठी जात असताना झालेल्या अपघातात तीन लहान मुलांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

जाहिरात

जालना अपघात

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

रवी जैस्वाल, प्रतिनिधी जालना, 25 जून : राज्यात रविवार हा अपघात वार ठरला आहे. वेगवेगळ्या जिल्ह्यातील तीनचार अपघातात जवळपास 15 लोकांचा मृत्यू झाला आहे. जालन्यात आयशर ट्रकनं दुचाकीला जोरदार धडक दिल्यानं तीन चिमुकल्यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. वडील आपल्या मुलांना दुचाकीवरुन घेऊन जाताना हा अपघात घडला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. अपघातात तीन चिमुकल्यांचा मृत्यू तीन चिमुकल्यांना घेवून वडील खरेदीसाठी डिमार्टला जात होते. यावेळी मंठा चौफुलीजवळील उड्डाणपुलावर आयशर ट्रकनं दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत तीनही चिमुकल्यांचा जागीच मृत्यू झाला तर वडील जखमी झाले आहेत. नुरेन शेख (6 वर्ष), आयेजा शेख (5 वर्ष) आणि अदाबिया सय्यद (3 वर्ष) अशी मृत झालेल्या चिमुकल्यांची नावं आहेत. दरम्यान आयशर चालक गाडी सोडून फरार झाला असून जखमी वडिलांवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. रत्नागिरी अपघातात 8 जणांचा मृत्यू रत्नागिरी जिल्ह्यात खाजगी प्रवासी वाहतूक करणारी टाटाची मॅजिक गाडी दापोलीकडून हारणेकडे जात होती. त्याचवेळी, समोरून येणाऱ्या ट्रक आणि टाटा मॅजिक गाडीची जोरदार धडक झाली. हा अपघात इतका भीषण होता की 8 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 2 जण गंभीर जखमी झाले. अपघातातील सर्व लोक अंजरले, अडखळ, पाजपंढरी या गावातील प्रवासी असल्याचे कळते आहे. स्थानिकांच्या साह्याने अनेकांना दापोली उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहे. अपघातानंतर ट्रक चालकाने पलायन केले. वाचा - लॅम्बॉर्गिनी ऑटोला जाऊन धडकली, दोघं गंभीर, कोट्यवधींच्या गाडीची झाली अशी अवस्था ट्रॅक्टरच्या ट्रॉली उलटल्याने 4 महिलांचा जागीच मृत्यू कारंडवाडी येथे शेतातील कामे करून घरी परत जात असताना ट्रॅक्टर ट्रॉली अरुंद पुलावरून कॅनॉलमध्ये पडून चार महिलाचा मृत्यू झाला. यामध्ये एक महिला जखमी झाली आहे. सातारा शहरालगत असलेल्या कारंडवाडी येथे ही घटना घडली. शेतातील कामे करून जनावरांचा चारा घेऊन घरी ट्रॅक्टर ट्रॉलीतून महिला जात होत्या. पावसामुळे या परिसरात रस्त्यावर चिखल झाला होता. कॅनॉलवरील अरुंद पुलावरून जात असताना घसरट्यामुळे ट्रॉली पलटी झाली. ट्रॉलीतील चार महिला कॅनॉलमध्ये पडल्या. त्यात एक महिला जखमी झाली आहे. ही माहिती मिळताच परिसरातील ग्रामस्थांनी तातडीने सर्वांना सातारा जिल्हा रुग्णालयात दाखल केले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या