मुंबई, 25 जून : भरधाव वेगाने जाणाऱ्या लॅम्बॉर्गिनीने ऑटो रिक्षाला धडक दिली आहे. या अपघातामध्ये ऑटो ड्रायव्हर आणि रिक्षेमध्ये असलेला इंडिगो एयरलाईन्सचा इंजिनिअर गंभीर जखमी झाला आहे. या दोघांनाही खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सध्या त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत. दिल्लीच्या चिराग फ्लायओव्हरवर रविवारी सकाळी हा अपघात झाला. जखमी झालेला इंजिनिअर ऑटोने एयरपोर्टवर जात होता, तर कार चालक मित्रांसोबत दिल्लीत फिरत होता. ही कार हरियाणातल्या व्हीआयपी नंबरची आहे. कोट्यवधींच्या या कारला पोलिसांनी जप्त केलं आहे. तसंच सीआर पार्क पोलिसांनी तपासाला सुरूवात केली आहे. या अपघातामध्ये कारचंही मोठं नुकसान झालं आहे. भरधाव ट्रक कार-बाईकला आदळला, पुणे-सोलापूर हायवेवर भयावह अपघात, CCTV पाहून येईल अंगावर काटा इंडिगो एयरलाईन्सचा इंजिनिअर प्रिन्स गौतम (वय 31 वर्ष) एयरपोर्टवर जात होता तेव्हा वेगात येणाऱ्या लॅम्बॉर्गिनीने ऑटोला ठोकलं. या अपघातानंतप ऑटो ड्रायव्हर आणि इंजिनिअर या दोघांची प्रकृती गंभीर आहे. तर लॅम्बॉर्गिनी चालवणाऱ्या व्यक्तीचं नाव राजवीर असून तो 24 वर्षांचा आहे. परदेशामध्ये शिकत असलेला राजवीर सुट्टीसाठी दिल्लीमध्ये आला होता. अपघातावेळी कारमध्ये 4 जण होते. आरोपींना पोलिसांनी अजून अटक केलेली नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.