नारायण काळे, प्रतिनिधी जालना, 5 जून : आपल्या देशात अनेक प्राचीन मंदिरे आहेत. श्रीराम, कृष्ण आणि महादेव यांच्याबरोबर असंख्य देवी देवता यांना मानणारा वर्ग खूप मोठा आहे. प्रत्येक मंदिराला वेगळं महत्त्व असते. जालना शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेलं कनकनेश्वर महादेव मंदिर देखील यापैकीच एक. वाळूचा महादेव म्हणून देखील या मंदिराला ओळखलं जातं. या ठिकाणी गुरुवारी सत्संग, भजन आदी कार्यक्रम होतात. विविध वाद्यांच्या तालासुरात होणारे शिवभजन हे भजन अतिशय श्रवणीय असते. काय आहे मंदिराची अख्यायिका पूर्वी या ठिकाणी ओढा वाहायचा. ओढ्याचे पाणी कमी झाले की आपोआप महादेवाची मूर्ती शिवलिंग तयार व्हायचे असें इथले भक्त सांगतात. या मंदिरात दोन शिवलिंग आहेत. यापैकी एक शिवलिंग वाळू पासून तयार झालेलं असल्यानं या मंदिराला वाळूचा महादेव म्हटलं जात. श्रावण महिन्यात इथे मोठी गर्दी असते. तसेच जालना शहरातून श्रावणात कावड यात्रा काढली जाते. या यात्रेची सांगता कनकनेश्वर मंदिरात होते.
विविध प्राणी पक्षांचा वावर असलेला वाळूचा महादेव मंदिर परिसर विविध झाडा वेलिने नटलेला आहे. त्यामुळे निसर्गाच्या सानिध्यात रमण्यासाठी जालनाकर मोठ्या प्रमाणावर मंदिर परिसरात गर्दी करत असतात. परिसरात विविध दुर्मिळ पक्षा बरोबर हरीण, नीलगाय, मोर सहज नजरेस पडतात. हे प्राणी पक्षी पाहण्यासाठी देखील मोठ्या संख्येने नागरिक इथे येत असतात.
Jalna News : 800 वर्ष जुनं अन् पंचमुखी शिवलिंग, राज्यातलं हे महादेवाचं मंदिर पाहिलंय का?
गुरुवारी गायले जाते भजन हे अतिशय प्राचीन मंदिर आहे. श्रावण महिन्यात इथे कावड यात्रा येते तसेच दररोज आरती होते. दर गुरुवारी आम्ही एकत्र जमतो आणि महादेवाच्या भक्तीत लीन होत देवाचे भजन गात असतो. यामुळे आम्हाला वेगळीच ऊर्जा मिळते. तसेच दररोजचे ताण तणाव क्षणात दूर होतात. आत्मिक शांती मिळवण्यासाठी आम्ही इथे येवून भजन करत असल्याचे कैलाश कींगरे यांनी सांगितले.