नारायण काळे, प्रतिनिधी जालना 12 मे : गाणं गायला अनेकांना आवडतं. पण हेच गाणं अनेकांचा छंद बनतं. हेच जालन्यातील संबोधी इंगोले सोबत घडले आहे. वयाच्या अवघ्या सातव्या वर्षापासून तिला संगीताची गोडी लागलीय. कोरोना काळात सगळं जग नकारात्मक तेच्या गर्तेत असताना इंगोले कुटुंब मास्क बनवून लोकांना वाटत होते. तेव्हापासून संबोधीच्या छंदाला आई वडिलांनी पाठबळ दिले आणि आज संबोधी हिंदी, मराठी आणि देशभक्ती गीतांची सुरेल सादरीकरण करत आहे. त्यामुळे नुकताच छत्रपती संभाजीनगर शहरात झालेल्या द व्हॉईस ऑफ टॅलेंट स्पर्धेत संबोधिने पहिलं पारितोषक मिळवलं आहे. कशी झाली सुरुवात? संबोधी संदीप इंगोले जालना शहरात राहते. सूर ज्यांना साथ देतात त्यांचच असते गाणं, गळा काढून रडणाऱ्याचं खोटं असतं नाणं. या कवितेतील पहिल्या ओळीचा अर्थ समजून घेत संबोधीने वयाच्या सातव्या वर्षी समजून घेत आपली गीत संगीताची साधना सुरु केली. ऐन कोरोनाच्या सक्तीच्या सुटीत नकारात्मक विचार न करता सकारात्मक वाट धरत, मोबाईलसह ऑनलाइन गाणे शिकण्याला तिने सुरुवात केली. हिंदी, मराठी आणि देशभक्ती गीतांची सुरेल सादरीकरण ती सध्या करत आहे.
कोरोना काळात मी पहिल्या वर्गात असताना माझी आई मास्क शिवायची आणि वडील ते मोफत वाटायचे. तेव्हा मी आई बाबांना कविता म्हणून दाखवयाचे. एक दिवस मला शाळेतून कॉल आला की कार्यक्रमासाठी गाणे पाठवा. मग मी छोडो कल की बाते हे गाणे पाठवले. तेव्हापासून मला संगीताची आवड लागल्याचे संबोधिने सांगितले. कोणते गाते गाणे? रुपेरी वाळूत, ओहो तुम्हे चांद पे ले जाये, चंद्रा, मेघा रे मेघा रे, तेरे संग प्यार मे, पापा मेरे पापा, निंदिया से जागे बहार, उनसे मिली नजर, हसता हुआ नूरानी चेहरा, मी रात टाकली, मंदीच्या पानावर, तूने ओ रंगीले, केव्हा तरी पहाटे, शारद सुंदर, निले निले अंबर पर, गणनायका, तुझ्याविना वैकुंठाचा, घागर घेऊन घागर घेऊन, स्वर्ग हा नवा, मल्हारवारी, सामी अशी एक ना अनेक गीते सादर करीत संबोधी गायनात रंगते. लहान वयात गाण्याचा छंद म्हणून नव्हे तर साधना म्हणून गाण्यातच लक्ष देत नवीन काहीतरी शिक्षण घेण्याचा ध्यास संबोधीला आहे.
डोंबिवलीकर लय भारी, तब्बल 40 वाद्यं वाजवतो हा तरुण, विश्वास नसेल तर पाहा हा VIDEO
मिळवले पहिले पारितोषिक नुकत्याच छत्रपती संभाजीनगरात पार पडलेल्या मराठवाडा पातळीवर द व्हाईस ऑफ टॅलेंट गीतगायन स्पर्धेत संबोधी इंगोले हिला पहिले पारितोषिक मिळाले आहे. आपली ओळख निर्माण केली अवघ्या नऊ वर्षाची संबोधी सध्या विविध कार्यक्रमात मराठी आणि हिंदी सरस गीते सादर करीत आहे. बालवयात आवाजाची तरलता जपत सूर- ताल अन लयीची समज उमज संबोधीला येत असल्याचे अनेक गीतातून दिसून येते. मराठी आणि हिंदी गाणे सादर करीत संबोधीने मराठवाड्यात आपली ओळख निर्माण केली आहे.