JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / तिखट मिरची झाली गोड! फक्त 30 गुंठे लागवडीतूनच शेतकरी झाला लखपती

तिखट मिरची झाली गोड! फक्त 30 गुंठे लागवडीतूनच शेतकरी झाला लखपती

मिरचीचे दर वाढल्यानं घरतील बजेट कोलमडलंय. पण, ‘या’ शेतकऱ्याला मोठा फायदा झालाय.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

जालना, 11 जुलै :  मिरची आणि टोमॅटोचे दर गगनाला भिडले असल्याने गृहिणींचे बजेट कोलमडले आहे. या दरवाढीचा फायदा सगळ्याच शेतकऱ्यांना मिळत नाही. काही शेतकरी मात्र यातून चांगले आर्थिक उत्पन्न मिळवतात. जालना जिल्ह्यातील खादगाव येथील शेतकरी सुनील साबळे यांनी मिरची उत्पादनातून आर्थिक फायदा मिळवला आहे. अवघ्या ३० गुंठे मिरचीतून त्यांना 2 लाख रुपयांचे मिरची उत्पादन झालं आहे. कसं केलं नियोजन? सुनील साबळे आणि त्यांचे आणखी दोन भाऊ पूर्णवेळ शेती पाहतात. शहराजवळ गाव असल्याने भाजीपाला पिके घेण्याकडे त्यांचा कल असतो. फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात त्यांनी चार बाय एक अंतरावर मिरची रोपांची लागवड केली. यासाठी लागणारे रोप त्यांनी घरीच तयार केले. लागवड केल्यानंतर योग्य मशागत केली. वेगवेगळी कीटकनाशके आणि खतांचे डोस दिले. पाण्याची बचत व्हावी म्हणून मलचींग पेपर अंथरले. ठिबक सिंचन द्वारे पाणी देण्याची सुविधा केली. यासाठी त्यांना एकूण 50 हजार रुपये खर्च आला.

या तयारीनंतर दोन महिन्यांनी म्हणजेच   एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून मिरची निघण्यास सुरुवात झाली. सुरवातीला दर 4 ते 5 हजार रुपये प्रति क्विंटल असा मिळाला. त्यानंतर किंमत वाढू लागली. एप्रिल आणि मे महिन्यात प्रत्येकी 50 हजार,  तर जून महिन्यात 1 लाख असे एकूण 2  लाखांचे उत्पन्न आतापर्यंत त्यांना झाले आहे. मिरचीचे दर असेच कायम राहिले तर आणखी एक ते दीड लाख रुपयांची कमाई होईल, अशी अपेक्षा सुनील साबळे यांनी व्यक्त केलीय. दुष्काळी भागातील गाव बनलं टोमॅटोचं आगार, 200 एकरमध्ये केली विक्रमी लागवड, Video आमचा भाजीपाला आणि दुधाचा व्यवसाय आहे. आम्ही दरवर्षी मिरची, टोमॅटो, वांगी अशी भाजीपाला पिके घेत असतो. ही पिकं कधी फेकून देण्याची वेळ येते तर कधी त्यांना चांगला भाव मिळतो. सरासरी 4 ते 5 हजार रुपये प्रति क्विंटल असा दर मिळतो. सध्याचा दर कधीतरीच मिळत असल्याचं साबळे यांनी सांगितलं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या