JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / अजित पवारांचं भाषण सुरू असतानाच अजान सुरू झाला, त्यानंतर...

अजित पवारांचं भाषण सुरू असतानाच अजान सुरू झाला, त्यानंतर...

इंदापूरमध्ये एका कार्यक्रमासाठी आलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी त्यांचं भाषण मध्येच थांबवलं. अजितदादांचं भाषण सुरू असताना अचानक अजान (Ajan) सुरू झाला, त्यामुळे अजित पवार भाषण करत असताना थांबले.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

इंदापूर, 6 फेब्रुवारी : इंदापूरमध्ये एका कार्यक्रमासाठी आलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी त्यांचं भाषण मध्येच थांबवलं. अजितदादांचं भाषण सुरू असताना अचानक अजान (Ajan) सुरू झाला, त्यामुळे अजित पवार भाषण करत असताना थांबले. अजान संपल्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा भाषणाला सुरूवात केली. या भाषणादरम्यान त्यांनी केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांवरही टीका केली. चर्चेच्या 15 फेऱ्या झाल्या, पण काहीच नाही. खिळे मारत आहेत, काही जनाची नाही, मनाची आहे का नाही? लोकशाहीमध्ये ठोकशाही करत आहेत. माध्यमांनी उचलून धरल्यावर खिळे काढायला लागले. भाजपचा एकही नेता शेतकऱ्याच्या बाजूने बोलत नाही, असं अजित पवार म्हणाले. कार्यकर्त्यांशी संवाद साधत असताना अजितदादांनी निर्व्यसनी राहण्याचा सल्ला दिला. सभेमध्ये कार्यकर्त्यांना निर्व्यसनी राहण्याचा सल्ला देताना अजित पवारांनी जोरदार बॅटिंग केली. एक बाटली तोंडाला लावली की आपण खलासच करतो, फक्त पाण्याची, असं अजित पवार म्हणाले. अजित पवारांच्या या वक्तव्यानंतर कार्यक्रमात एकच हशा पिकला. इंदापूरकरांनी आमच्या हातात सत्ता द्या, त्यांच्यापेक्षा जास्त विकास करून दाखवतो. नाही दाखवलं तर अजित पवार नाव सांगणार नाही, असं आवाहन अजित पवारांनी केलं. Must Watch : ‘एकदा बाटली तोंडाला लावली की आपण…’ इंदापुरात अजितदादांची जोरदार बॅटिंग

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या