JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / VIDEO: बारामतीत राडा, मुख्यमंत्र्यांचं भाषण पवारांच्या कार्यकर्त्यांनी थांबवलं

VIDEO: बारामतीत राडा, मुख्यमंत्र्यांचं भाषण पवारांच्या कार्यकर्त्यांनी थांबवलं

मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेमध्ये असा गोंधळ झाल्याने पोलिसांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांवर लाठीमार केला. ताब्यात घेतलेल्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना जोपर्यंत सोडत नाहीत तोपर्यंत नारा देत राहणार असल्याची भूमिका राष्ट्रवादीकडून घेण्यात आली आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

बारामती, 14 सप्टेंबर : बारामतीमध्ये आयोजित भाजपच्या महाजनादेश यात्रेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना गोंधळ घातला असल्याची माहिती देण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांच्या सभेत राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांचा ‘एकच वादा अजित दादा, एकच साहेब पवारसाहेब’ अशा घोषणा दिल्या. मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेमध्ये असा गोंधळ झाल्याने पोलिसांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांवर लाठीमार केला. ताब्यात घेतलेल्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना जोपर्यंत सोडत नाहीत तोपर्यंत नारा देत राहणार असल्याची भूमिका राष्ट्रवादीकडून घेण्यात आली आहे. दरम्यान, पवारांच्या बारामतीमध्ये मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी असा गोंधळ घातल्यामुळे भाजपच्या मेगाभरतीवर शरद पवार खरंच घाबरले की काय अशा चर्चांणा उधाण आलं आहे. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी संपूर्ण परिस्थिती आटोक्यात आणली असून कार्यकर्त्यांची चौकशी सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. खरंतर शुक्रवारीच मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर शाईचा फुगा फेकरण्यात आल्याचं समोर आलं होतं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेच्या तिसऱ्या टप्प्याला शुक्रवारी नगरमधून सुरुवात झाली होती. त्याचदरम्यान एका तरुणीचा उद्रेक झाला. तिने ‘सीएम गो बॅक’च्या घोषणा देत मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील गाडीवर शाईचा फुगा फेकल्याचा दावा केला आहे. धक्कादायक म्हणजे तरुणी गाड्याच्या ताफ्याच्या विरुद्ध दिशेला धावत सुटल्याची माहिती मिळाली आहे. शर्मिला येवले असं या तरुणीचे नाव असून ती स्वाभिमानी शेतकरी संघटनेची कार्यकर्ता असल्याचं समजतं. इतर बातम्या - मेगाभरतीनंतर आता भाजपचा मास्टर प्लॅन, युतीचं घोडं अडलेलं असताना नवा प्रचार सरकारचं महापोर्टल बंद करावं, पिचडांना उमेदवारी देऊ नये, राज्यातील महिलांच्या सुरक्षेसाठी उपाययोजना कराव्यात, ही मागणी करत अकोले येथे शर्मिली येवले या तरुणीने मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर शाई फेकण्याचा प्रयत्न केला. मात्र, मुख्यमंत्र्यांचा मुख्य ताफा येण्याच्या अगोदर पुढे असलेल्या वाहनावर तिने निळी शाई फेकण्याचा प्रयत्न केला. ताफा निघून गेल्यानंतर पाच मिनिटांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ताफा अकोले येथे सभेच्या ठिकाणी दाखल झाला. पोलिसांनी अद्याप संबंधित तरुणीवर कोणतीही कारवाई केली नाही. तिने फेकलेली शाई रोडवर पडलेली दिसत होती. तिच्या मागण्या रास्त असतील, मात्र पद्धत चुकीची वाटते.तिचा अपघात होऊ शकला असता, अशी चर्चा आता सुरू झाली. इतर बातम्या - धोनीसोबतच्या ‘त्या’ फोटोवर विराटनं दिलं उत्तर, म्हणाला… समारोपाला पंतप्रधान नरेंद्र मोदी येणार महाजनादेश यात्रेच्या तिसऱ्या टप्प्याच्या नाशिक येथे 19 सप्टेंबरला समारोप होणार आहे. समारोपाला पंतप्रधान नरेंद्र मोदी येणार आहेत. महाजनादेश यात्रेत महाजनादेश सहभागी होणार असून ते नाशिक येथे होणाऱ्या सभेला संबोधित करणार आहेत. दरम्यान, आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय पक्षांनी तयारीला सुरुवात केली असून यात्रांच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचण्याची रणनीती आखली आहे. ‘पत्रीपूल कब बनेगा’ कल्याणकर तरुणाचं रॅप साँग, पाहा हा VIDEO

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या