JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / अण्णा हजारेंची 1 मे रोजी हत्या करणार, कुटुंबावर अन्याय झाल्याने तरुणाचा इशारा

अण्णा हजारेंची 1 मे रोजी हत्या करणार, कुटुंबावर अन्याय झाल्याने तरुणाचा इशारा

श्रीरामपूर तालुक्यातल्या निपाणी वडगाव इथल्या संतोष गायधने यांनी अण्णा हजारेंची हत्या करणार असा इशारा दिलाय.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

श्रीरामपूर, 12 एप्रिल : शेतीच्या वादातून संगनमताने कुटूंबावर अन्याय झाल्यानंतर संतोष गायधने याच्या कुटुंबावर दबाव आणला जात आहे. खोट्या केसेस दाखल केल्या जात असून कुटुंब भीतीच्या छायेखाली जगतंय. अण्णा हजारेंसह वरीष्ठ पोलीस अन् मंत्र्यांनाही निवेदन दिलं तरी काहीच होत नसल्याने गायधने यांनी अण्णा हजारेंची हत्या करणार असा इशारा दिला. याबाबत मिळालेली माहिती अशी की, श्रीरामपूर तालुक्यातल्या निपाणी वडगाव इथल्या संतोष गायधने यांनी अण्णा हजारेंची हत्या करणार असा इशारा दिलाय. शेतीच्या वादातून संगनमताने कुटुंबावर अन्याय झाल्याचा आरोप त्यांनी केलाय. शेतीच्या वादातून गटातील ९६ जणांनी कुटुंबावर दबाव आणला असून खोट्या केस दाखल करून भीती दाखवण्यात येत असल्याचं त्यांनी म्हटलं. पुण्यात माझ्यामुळे जीवाला धोका असलेल्याला संरक्षण द्या - अजित पवार   कुटुंब भीतीच्या सावटाखाली जगत आहे. यासंदर्भात अण्णा हजारेंसह वरीष्ठ पोलीस आणि मंत्र्यांनाही निवेदन दिलं आहे. पण तरीही कारवाई होत नसल्यानं कुटुंबीय हतबल झालं आहे. राष्ट्रपतींकडे यामुळे आत्महत्येसाठी परवानगी मागितली असल्याचं संतोष गायधने यांनी म्हटलं. दरम्यान, अण्णा हजारे हे या प्रकरणात मॅनेज झाले असल्याचा आरोप गायधने यांनी केलाय. तसंच 1 मे रोजी अण्णा हजारेंची राळेगण सिद्धीत जावून हत्या करणार असा  इशारा दिला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या