मुंबई, 26 मार्च: मुंबई (Mumbai Covid-19 Hospital Fire) येथील गुरुवारी रात्री एका कोविड रुग्णालयाला भीषण आग लागली. दोन जणांचे मृतदेह याठिकाणी सापडले आहे. सनराइज हॉस्पिटलमध्ये ही दुर्घटना घडली. दरम्यान हॉस्पिटलने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की या रुग्णांचा मृत्यू आधीच कोरोनामुळे झाला होता. त्यामुळे त्यांचा मृत्यू नक्की आगीमुळे झाला की कोरोनामुळे यामध्ये संभ्रम आहे. या रुग्णालयात 76 रुग्ण उपचार घेत होते. रुग्णालयाला लागलेल्या आगीचं कारण नेमकं कळू शकलेलं नाही. मुंबईत कोरोनाचं संकट असतानाच आणखी एक भीषण दुर्घटना घडल्याचं समोर आलं आहे. भांडूपमधील ड्रिम मॉलमध्ये (Bhandup Dream Mall Fire) तिसऱ्या मजल्यावर स्थित सनराइझ कोविड रुग्णालयात भीषण आग लागली. आगीची माहिती पोलीस आणि अग्निशमन दलाला मिळताच त्यांनी तातडीनं पावलं उचललं मात्र तोपर्यंत आगीनं रौद्र रुप धारण केलं होतं. मिळालेल्या माहितीनुसार -सनराइझ रुग्णालय हे कोविड रुग्णालय आहे. -रात्री 11.30 वाजता शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. -आगीची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले. -आगीची माहिती मिळाल्यानंतर अग्निशामक दलानं घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर काही वेळानं आग नियंत्रणात आणण्यात यश आलं. -आगीवर नियंत्रण मिळवण्याचं काम सुरू असून रुग्णांना तातडीनं दुसऱ्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.
बचावकार्य सुरु असून रात्री उशिरा महापौर किशोरी पेंडणेकर घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. त्यांनी बचावकार्य वेगानं करण्याचे आदेश दिले आहेत.
या आगीत अनेक रुग्ण होरपळे आहेत. आगीत जखमी झालेल्या रुग्णांना फोर्टीज रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.