JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / ठाण्यात पोलीस भरतीमध्ये गैरप्रकार; एकाला अटक, कॉपीची पद्धत बघून पोलीसही चक्रावले

ठाण्यात पोलीस भरतीमध्ये गैरप्रकार; एकाला अटक, कॉपीची पद्धत बघून पोलीसही चक्रावले

ठाण्यातून मोठी बातमी समोर येत आहे. पोलीस भरतीच्या परीक्षेदरम्यान गैरप्रकार करणाऱ्या एका परीक्षार्थ्याला अटक करण्यात आली आहे.

जाहिरात

पोलीस भरतीमध्ये कॉपी

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

ठाणे, 2 एप्रिल, अजित मनधरे :  ठाण्यातून मोठी बातमी समोर येत आहे. पोलीस भरतीच्या परीक्षेदरम्यान गैरप्रकार करणाऱ्या एका परीक्षार्थ्याला अटक करण्यात आली आहे. विशेष म्हणजे हा डमी परीक्षार्थी असल्यचं समोर आलं आहे. अटक करण्यात आलेला व्यक्ती हा बालाजी कुसरळकर या परीक्षार्थीच्या जागी डमी परीक्षार्थी म्हणून परीक्षा देत होता. यासाठी त्याने दहा हजार रुपये घेतल्याची माहिती मिळत आहे. हा डमी परीक्षार्थी परीक्षेदरम्यान कॉपी करताना पकडला गेला आहे.   मोबाईलच्या मदतीनं कॉपी   घटनेबाबत अधिक माहिती अशी की, ठाण्यातून हायटेक कॉपी बहाद्दराला अटक करण्यात आली आहे. त्याच्याविरोधात राबोडी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटक केल्यानंतर हा परीक्षार्थी डमी असल्याची माहिती समोर आल्यानं खळबळ उडाली आहे.  पोलीस भरतीच्या पेपरमध्ये हा विद्यार्थी मोबाईच्या मदतीनं कॉपी करत होता. मात्र हा गैरप्रकार पर्यवेक्षकांच्या लक्षात आल्यानं या डमी परीक्षार्थ्यावर कारवाई करण्यात आली आहे. डीसीपी गणेश गायकवाड यांनी या प्रकरणात कारवाई केली. मोठी बातमी! भाजप नेत्याची गोळ्या झाडून हत्या, भर रस्त्यात आरोपींचा अंदाधुंद गोळीबार अशी केली कॉपी  या परीक्षार्थीने कॉपी करण्यासाठी अत्यंत हायटेक मार्गाचा अवलंब केला आहे. कानात गव्हाच्या आकाराचा इअरफोन लावून तो कॉपी करत होता. तर मोबाईल गुढग्याच्या नी कॅपमध्ये लपवला होता. मात्र ही बाब उपस्थित पर्यवेक्षकांच्या लक्षात आल्यानं त्यांनी तातडीनं या प्रकरणात कारवाई केली. या डमी परीक्षार्थीविरोधात राबोडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या