धनंजय दळवी, प्रतिनिधी मुंबई, 14 मार्च : ग्रामीण भागातील महिला विविध योजनांचा लाभ घेत व्यवसायात भरारी घेत आहेत. धाराशिव जिल्ह्यातल्या उमरगा तालुक्यातील गुंजोटी गावातील महिलानी एक नव्हे तर 21 प्रकारच्या पौष्टिकमूल्य असलेल्या शेवया तयार करून विक्री करण्याचा उद्योग सुरू केला आहे. विशेष म्हणजे लॉकडाऊनमध्ये सर्व जग बंद असताना त्यांना ही कल्पना सुचली. त्याचवेळी त्यांनी हा व्यवसाय सुरू केला. आता या शेवयाची मागणी वाढत असून वर्षाकाठी या महिला काही लाखांचे उत्पन्न मिळवत आहे. नवी मुंबईत सुरु असलेल्या प्रदर्शनात या महिलांचा स्टॉल असून त्यांनी यावेळी त्यांच्या व्यवसायाबाबत माहिती दिली आहे. कशी सुचली कल्पना? फास्ट फूडमुळे अनेकांना आरोग्याबाबतच्या अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहेत. उस्मानाबाद जिल्ह्यातील गंजोटी येथील महिलांनी सेंद्रिय भाजीपाल्यापासून पोषणमूल्य असलेल्या शेवया तयार करून विक्री करण्याचा व्यवसाय सुरू केला आहे. या शेवयाला आता मागणी वाढू लागली आहे. या शेवयामध्ये शेवगा, फ्लेवर, पालक, मेथी, नाचणी, सोयाबीन, गहु, सोजीरवा, चॉकलेट, बटरस्कॉच, व्हेनीला, पाइनापल, केवी, दूध, बाजरी, मँगो, ब्लॅकओट्स, शुगर फ्री नुडल्स, रोस्टेड आणि मिक्स फ्लेवरमध्ये शेवया उपलब्ध आहेत. कोरोना काळात दाखवलं धाडस, विसाव्या वर्षीच तरुण बनला लखपती! Video सर्वसामान्यपणे लहान मुले भाजीपाला खाण्यास टाळतात. त्यामुळे या महिलांनी सेंद्रिय पद्धतीने पिकवलेल्या भाज्यांचा फ्लेवर तयार करून त्यापासून या पोषणमूल्य असलेल्या शेवया विक्रीसाठी बाजारात आणल्या आहेत. पोषणमूल्य असलेलं अन्न गर्भवती महिला किशोरी मुली आणि लहान मुलांना मिळावे म्हणून हा व्यवसाय निवडला आहे. या शेवयाची मागणी वाढत आहे धाराशिव जिल्ह्यासह सोलापूर, लातूर, हैद्राबाद तसेच पुण्याच्या काही मॉलमधून या शेवयाची विक्री होत आहे. लॉकडाऊनमध्ये सुचली कल्पना या महिलांच्या गटातील अस्मिती सूर्यवंशी यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘आम्हाला ही कल्पना लॉकडाऊनमध्ये सुचली. त्यावेळी आम्ही सर्व महिला घरीच बसून होतो काही शेतकरी महिला पालेभाज्या पिकवायच्या पण तेव्हा मार्केट बंद होतं. सातासमुद्रापार फेमस असलेलं कोल्हापुरी मटणाचं लोणचं कसं बनतं? पाहा Recipe Video त्यावेळी नुडल्स खाण्यानं अनेक आजार उद्भवतात, अशा बातम्या आम्ही प्रसारमाध्यमांमध्ये पाहिल्या. त्या बातम्या पाहून पालेभाज्या आणि शेवायांपासून काहीतरी निर्मिती करण्याची आम्हाला कल्पना सुचली. त्यावेळी आम्ही पालक, मेथी, गाजर, शेवग्याची शेंग अशा विविध प्रकारच्या शेवया तयार केल्या. तेव्हापासून आमची वाटचाल सुरू झाली. आज आम्ही 21 प्रकारच्या शेवया करतो. या शेवयांची किंमत 70 रुपयांपासून 800 रुपयांपर्यंत आहे,’ असं त्यांनी स्पष्ट केलं.