जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Success Story : कोरोना काळात दाखवलं धाडस, विसाव्या वर्षीच तरुण बनला लखपती! Video

Success Story : कोरोना काळात दाखवलं धाडस, विसाव्या वर्षीच तरुण बनला लखपती! Video

Success Story : कोरोना काळात दाखवलं धाडस, विसाव्या वर्षीच तरुण बनला लखपती! Video

Success Story : देशसेवा करण्याचे स्वप्न पाहणारा हा तरुण दुग्ध व्यवसायात उतरला आहे. यातून तो लाखो रुपये कमावत आहे.

  • -MIN READ Jalna,Maharashtra
  • Last Updated :

    नारायण काळे, प्रतिनिधी जालना, 11 मार्च : मराठवाडा आणि दुष्काळ हे समीकरणच होऊन बसले आहे. जालना जिल्हा देखील याला अपवाद नाही. यामुळे कापूस, सोयाबीन अशी कोरडवाहू पिके हीच शेतकऱ्यांच्या उपजिविकेची मुख्य साधनं. त्यामुळे दुग्ध व्यवसाय इथे जास्त रुजलाच नाही. तरीदेखील वयाच्या अवघ्या 19 व्या वर्षीच दुग्ध व्यवसाय सुरु करून वर्षाला लाखो रुपये जालन्यातील  तरुण कमावत आहे. कधीकाळी सेनेत जाऊन देशसेवा करण्याचे स्वप्न पाहणारा हा तरुण दुग्ध व्यवसायात कसा उतरला पाहुयात. कशी झाली सुरुवात? जिल्ह्यातील दहिफळ काळे इथला निवासी असलेला तरुण अमर काळे हा सैन्यात जाण्यासाठी प्रयत्नशील होता. त्यासाठी त्याने छञपती संभाजीनगर इथे  अकॅडमी देखील लावली. मात्र, काहीच दिवसात कोरोना आला आणि लॉकडाऊनमुळे त्याला घरी यावे लागले. यामुळे घरी शेती थोडी असल्याने रिकाम्या वेळेत काय करावे हा प्रश्न त्याला पडू लागला. जून 2021 मध्ये त्याच्या वडिलांनी त्याला एक एचएफ गाय घेऊन दिली. त्यानंर दोनेक महिन्यांनी त्यांनी आणखी दोन गायी खरेदी करून या व्यवसायात पाऊल टाकले.

    News18लोकमत
    News18लोकमत

    व्यवसाय आणखी वाढवणार दुग्धव्यवसाय जम बसल्यानंतर त्यांनी आणखी एक गाय खरेदी केली असून तिची दूध देण्याची क्षमता 24 लिटर एवढी आहे. ‘आता दिवसाला किमान 50 लिटर दूध डेअरीला विक्री होते. त्याला 35 ते 40 रुपयांचा दर मिळतो. महिन्याकाठी 50 हजार रुपये दूध विक्री मधून मिळतात. तसेच वर्षाच्या शेवटी शेणखत मधून एक लाख रुपयांचे उत्पादन होते. या व्यवसायात नवीन असल्याने सुरुवातीला कठीण वाटले मात्र आता सवयीचा भाग झाल्याने काही वाटतं नाही. आणखी दोन गायी खरेदी करून व्यवसाय आणखी वाढवणार आहे’, असं अमर काळे सांगतो.

    ‘ती’ युक्ती ठरली सरस, नाशिकचा तरुण दूध उत्पादनातून करतोय लाखोंची कमाई, Video

    सकाळी पाच वाजताच त्यांच्या कुटुंबाची लगबग सुरू होते. शेण काढणे, मेळवन भिजवणे, धारा काढणे, त्यांना ढेप आणि चारा टाकने ही नित्याची कामे करावी लागतात. तसेच या व्यवसायात एकही दिवस सुट्टी घेता येत नाही. व्यवसाय उभा करण्यासाठी अमर काळे याला 4 लाख रुपये खर्च आला. यात शेड साठी 70 ते 80 हजार, कुट्टी मशीन साठी 25 हजार तर गायीमध्ये त्याने एकूण 3 लाखांची गुंतवणूक केली आहे.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात