JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Anganwadi News : अंगणवाडीतील सुकडीच्या पुड्यांमध्ये आढळल्या अळ्या; प्रशासनाने घेतला मोठा निर्णय

Anganwadi News : अंगणवाडीतील सुकडीच्या पुड्यांमध्ये आढळल्या अळ्या; प्रशासनाने घेतला मोठा निर्णय

Anganwadi News : धाराशिव शहरातील अंगणवाडी विद्यार्थ्यांना आहारात दिल्या जाणाऱ्या सुकडीच्या पुड्यांमध्ये किडे आढळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता.

जाहिरात

संग्रहित छायाचित्र

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

बालाजी निरफळ, प्रतिनिधी धाराशिव, 15 जुलै : न्यूज 18 लोकमतच्या बातमीचा पुन्हा एकदा इम्पॅक्ट समोर आला आहे. धाराशिव शहरातील अंगणवाडी विद्यार्थ्यांना आहारात दिल्या जाणाऱ्या सुकडीच्या पुड्यांमध्ये किडे, अळ्या निघाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. या आशियाची बातमी न्यूज 18 लोकमतने दाखवली होती. या बातमीनंतर धाराशिव जिल्ह्यातील प्रशासन खडबडून जागे झाले असून एकात्मिक बाल विकास सेवा प्रकल्पाच्या अधिकाऱ्याने या अंगणवाडीत जाऊन या सुकडीचा पंचनामा करत याचे नमुने घेतले आहेत. बातमीनंतर प्रशासनाला खडबडून जाग या खराब सुकडी पुरवठा करणाऱ्या प्रेरणा सामाजिक महिला संस्थेचा पाच अंगणवाडीचा पुरवठा बंद करण्यात आला असून प्रकल्प संचालक अधिकारी आर. व्ही. कड यांनी या संबंधित लेखी आदेश देखील काढला आहे. एकात्मिक बाल विकास विभागाबरोबरच अन्न व औषध प्रशासनाने देखील न्यूज 18 लोकमतच्या बातमीची दखल घेत या सुकडीचे नमुने घेत प्रयोगशाळेत पाठवले असून या दोन्ही विभागाकडून प्रयोगशाळेतील नमुन्याचा अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई केली जाणार आहे. न्यूज 18 लोकमतने बातमी दाखवल्या नंतर हा प्रकार उघड झाल्याचे अधिकारी न्यूज 18 लोकमतच्या कॅमेऱ्यासमोरच मान्य करत आहेत. दरम्यान आता जिल्ह्यातील इतर अंगणवाड्यांचीही अन्नपुरवठ्याची तपासणी केली जाणार असल्याचे एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी यांनी सांगितले. बालकांना खराब अन्नपुरवठा करणाऱ्या या संस्था चालकावर कठोर कार्यवाही करावी अशी मागणी होताना दिसत आहे. वाचा - आदर्श पतसंस्थेतील 22 लाख बुडाल्याची भीती; 38 वर्षीय शेतकऱ्याने मृत्यूला कवटाळलं धाराशिव जिल्ह्यात अनधिकृत शाळेचे पेव धाराशिव जिल्ह्यात अनधिकृत शाळेचे पेव फुटले असून शासनाची परवानगी न घेता जिल्ह्यात 10 शाळा अनधिकृतरित्या सुरू झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गटशिक्षण अधिकारी यांच्या अहवालातून हा प्रकार उघडकीस आला. या माध्यमातून खुलेआम शिक्षण हक्क कायद्याचे उल्लंघन होत असल्याचे नमूद करीत संबंधित शाळा व्यवस्थापनास 1 लाख रुपये दंडाची नोटीस शिक्षण विभागाने धाडली आहे. शिक्षण विभागाच्या शिक्षणाधिकारी साळुंखे यांनी ही नोटीस धाडली असून अनधिकृत शाळेचा गाशा गुंडाळावा व 1 लाख रुपये दंडही भरावा, अशी नोटीस जिल्ह्यातील 10 शाळांना पाठवली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या