JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Dharashiv news : विहिरीवर काम करणाऱ्या मजुरांना साखळ दंडाची शिक्षा, धाराशिवमधील प्रकाराने खळबळ

Dharashiv news : विहिरीवर काम करणाऱ्या मजुरांना साखळ दंडाची शिक्षा, धाराशिवमधील प्रकाराने खळबळ

Dharashiv News : धाराशिव जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. मजुरांना साखळ दंडात बांधून ठेवल्याचा प्रकार घडला आहे.

जाहिरात

मजुरांना साखळ दंडाची शिक्षा

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

बालाजी निरफळ, प्रतिनिधी धाराशिव, 18 जून : ऊसतोड कामगारांनी पैसे फेडले नाही म्हणून त्यांची मुलं डांबून ठेवल्याचा प्रकार बीडमध्ये उघडकीस आला होता. हे प्रकरण ताजे असतानाच आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. विहिरीवर काम करण्यासाठी आणलेल्या मजुरांना साखळ दंडाने बांधून ठेवत असल्याचा प्रकार धाराशिव जिल्ह्यात उघडकीस आला. या घटनेने एकच खळबळ माजली आहे. दिवसभर विहिरीत खोदकाम करून  घेतल्यानंतर रात्री पळून जाऊ नये म्हणून मजुरांना साखळीने ट्रॅक्टरला बांधून टाकण्यात येत होते.   पोलिसांनीच गुप्त माहितीच्या आधारे हा प्रकार समोर आणला. यात 11 मजुरांची यातून सुटका केली आहे. काय आहे प्रकरण? धाराशिव तालुक्यातील वखारवाडी येथे संदीप रामकिसन भोकसे या तरुण मुजराकडून दिवसभर बळजबरीने काम करून घेतल्यानंतर रात्री साखळीने बांधून टाकला जात असल्याची गुप्त माहिती ढोकी पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे ढोकी ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जगदीश राऊत यांच्या पथकाने वाखरवाडी येथे जाऊन त्या ठिकाणचा शोध घेतला तेव्हा त्या ठिकाणी त्यांना सहा मजूर आढळून आले. त्यांची चौकशी केली असता त्यांनाही कामानंतर बांधून टाकले जात असल्याचे समजले. या मुजराकडे संदीपची चौकशी केली असता तो खामसवाडी येथील विहिरीवर काम करत असल्याची माहिती मिळाली. लागलीच या मजुरांना घेऊन पोलिसांच्या पथकाने खामसवाडी गाठले, तिथे त्यांना संदीप भोकसेसह पाच जणांना विहिरीत काम करण्यासाठी उतरवले असल्याचे पोलिसांना आढळले. पोलिसांनी या सर्वांची सुटका करून घेत याप्रकरणी दोन आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे. वाचा - ‘मला बळजबरीने…’ 8 वर्षांच्या मुलीची खोटी तक्रार, फूड डिलिव्हरी बॉयला मारहाण झालेला प्रकार चुकीचा पण.. शिंगोली, जालना, वाशीम परिसरातून हे मजूर कामासाठी धाराशिव जिल्ह्यात आले होते. या गुन्ह्यातील मुख्य आरोपी संतोष जाधव हा गुत्तेदारी करत या मजुरांना एका आरोपीच्या मदतीने दिवसभर विहिरीवर काम करायला लावायचा व संध्याकाळी साखळीने कुलूप लावून बांधून ठेवायचा अशी माहिती मजुरांनी ढोकी पोलिसांना दिली आहे. तर जिल्ह्यात मजुरांचा प्रश्न हा रोज उद्भवतो. मजूर मिळत नसल्याने शेतकरी नेहमी मजुरांच्या शोधात असतात काही ठिकाणी मजूर पैसे घेतात व काम न करता निघून जातात अशाही तक्रारी अनेक ठिकाणी पोलिसात दाखल आहेत. झालेला प्रकार चुकीचा असून जे मजूर पळून गेले त्यांचाही शोध पोलिसांनी घेऊन त्यांचीही दप्तरी नोंद करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते करत आहेत. हातावरील पोट असणारे मजूर वाटेल ते काम करून आपली पोटाची खळगी भरत असतात. मात्र, या मजुरांवर अत्याचाराच्या अनेक घटना जिल्ह्यात पाहायला मिळतात तर कधी मजूर देखील शेतकऱ्यांना फसवत असल्याच्या घटना समोर येत असतात. मजूर व शेतकरी हे एकमेकांना पूरक असणाऱ्या गोष्टी आहेत. ओळखून दोघांनी सामंजस्याने व्यवहार पार पाडले तर साखळदंडात अडकून ठेवण्याची वेळ कोणावरच येणार नाही.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Tags:

फोटो

महत्वाच्या बातम्या