JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / आई-वडिलांसोबत ऊस तोडायला गेलेल्या लेकीसोबत भयानक घडलं, धाराशीव हादरलं

आई-वडिलांसोबत ऊस तोडायला गेलेल्या लेकीसोबत भयानक घडलं, धाराशीव हादरलं

आई-वडिलांसोबत ऊस तोडीसाठी गेलेल्या 13 वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार करण्यात आला.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

बालाजी निरफळ प्रतिनिधी कळंब : परिस्थिती हातातील पुस्कत बाजूला सारून आई वडिलांसोबत काम वाटून घ्यायला लावते. कधीकधी आपल्या वाईट परिस्थितीचा गैरफायदा घेणारे लोकही आपल्या आजूबाजूला असतात. असाच एक संतापजनक प्रकार कळंबमध्ये घडला आहे. आई-वडिलांसोबत ऊस तोडीसाठी गेलेल्या 13 वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार करण्यात आला. पीडित मुलीनं 15 दिवस उलटले तरी याबाबत कोणाला काही सांगितलं नाही. जगायचं कसं कोणाला बोलायचं बदनामी होईल या सगळ्या भीतीनं पीडित गप्प राहिली. मात्र वडिलांनी विश्वासात घेतल्यानंतर या मुलीनं घडलेला सगळा प्रकार सांगितला. त्यानंतर मुलीने टोकाचं पाऊल उचललं आहे. पीडित अल्पवयीन मुलीनं विष घेऊन आयुष्य संपवण्याचा प्रयत्न केला. या मुलीला सध्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. तिची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळाली आहे.

मध्यरात्री उठला, नवे कपडे घालून लावला टिळा; FB लाइव्ह करत तरुणाचं धक्कादायक पाऊल

धाराशिव आई वडिलांसोबत ऊस तोडीला गेलेल्या तेरा वर्षीय मुलीवर टोळी मुकादमाच्याच मुलाने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.  सांगली जिल्ह्यातील देवराष्ट्र तालुका कडेगाव जिल्हा सांगली येथे कळंब तालुक्यातील डीकसळ गावची मुलगी ऊस तोडणीसाठी गेली होती. वडील खाजगी कामानिमित्त गावी परतले असता ऊसतोड मुक्कामाच्याच मुलाने मुलीवर अत्याचार केल्याची घटना समोर आली. घटना घडून पंधरा दिवसाचा कालावधी लोटला पीडित मुलीने भीतीपोटी या घडलेल्या प्रकाराची वाचता केली नाही.

छ. संभाजीनगर गँगरेप प्रकरणाची धक्कादायक माहिती समोर, तिघांनी दिली भयानक कबुली

संबंधित बातम्या

वडिलांनी विश्वासात घेतल्यानंतर पीडित मुलीने घडलेला प्रकार वडिलांना सांगितला, मात्र ती हे सगळे आघात सहन करू शकली नाही. तिने विष घेऊन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. या प्रकरणी पोलिसांनी या नराधम आरोप विरोधात गुन्हा दाखल केला असून हे प्रकरण सांगली पोलिसाकडे पुढील तपासासाठी दिलं आहे. दरम्यान हे प्रकरण सांगलीकडे वर्ग झाल्याने पीडित मुलीचे वडील चिंता व्यक्त करत असून पोलिसांनी कारवाई करावी अशी अपेक्षा व्यक्त करत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या