JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / ST BUS : तोंडाने डिझेल ओढून एसटीत भरताना धक्कादायक घडलं; परांडा एसटी आगारातील प्रकार

ST BUS : तोंडाने डिझेल ओढून एसटीत भरताना धक्कादायक घडलं; परांडा एसटी आगारातील प्रकार

ST BUS : परांडा एसटी आगारात पोटात डिझेल गेल्याने कामगाराला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सफाई कामगारास तोंडाने डिझेल ओढून एसटीत भरण्यास भाग पाडल्याचा आरोप करण्यात आला आहे.

जाहिरात

परांडा एसटी आगारातील प्रकार

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

बालाजी निरफळ, प्रतिनिधी धाराशिव, 8 जून : धाराशिव जिल्ह्यातील परंडा एसटी बस आगारातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पोटात डिझेल गेल्याने सफाई कामगाराला रूग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. डिझेल पंप बंद असल्याने बॅरल मधील डिझेल पाईप लाऊन तोंडाने ओढत असताना सफाई कामगाराच्या पोटात डिझेल गेल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या कामगाराला उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही घटना बुधवारी 7 जून रोजी घडली आहे. काय आहे प्रकरण? समीर शेख, असे रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या सफाई कर्मचाऱ्याचे नाव आहे. परंडा एसटी बस आगारातील डिझेल पंप बंद असल्याने बॅरल मधील डिझेल पाईप लाऊन तोंडाने ओढून मग बसच्या टाकीत भरले जात आहे. एसटी बसमध्ये अश्या प्रकारे डिसेल भरण्याचे काम गेल्या 10 ते 12 दिवसांपासुन सुरू असतानाच परवा डिझेल भरत असताना समीर शेख यांच्या पोटात डिझेल गेले व त्यांना ठसका लागून श्वास बंद पडला. त्यांना तात्काळ उपचारासाठी उप जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे. दरम्यान, सफाई कामगारास तोंडाने डिझेल ओढून एसटीत भरण्यास भाग पाडल्याचा आरोप करण्यात आला आहे. स्टेअरिंगवर चालक तर ॲक्सिलेटरची दोरी महिला कंडक्टरकडच्या हाती गेल्या काही दिवसांपासून एसटी महामंडळाचा भोंगळ कारभार वारंवार समोर येत आहे. नुकतेच बुलढाणा जिल्ह्यात क्लच नसलेल्या एसटी बसने रस्त्यावर प्रवास केल्याची घटना घडली. धक्कादायक म्हणजे चालकाने पहिल्या गिअरवरती 50 किलोमीटर बस चालवली. यानंतर सांगली जिल्ह्यातील एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. वाचा - वऱ्हाड्यांची बस कोसळली दरीत, लग्नादिवशीच निघाल्या अंत्ययात्रा, 25 जणांचा मृत्यू सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ आगारातील एका एसटी चालकावर एसटी खराब झाल्याने आपल्या हाती बसचे स्टेअरिंग ठेवत अॅक्सिलेटरला दोरी बांधून ती महिला कंडक्टरच्या हातात देण्याची वेळ आली. कवठेमहांकाळ ते घाटनांद्रे या मार्गावर बस धावत असताना हा प्रकार घडला असल्याचं सांगण्यात येत आहे. यामुळे एसटीचा आणि नादुरुस्त एस टी बसेचचा मुद्या पुन्हा चव्हाट्यावर आला आहे. अॅक्सिलेटर खराब झालेल्या बसमुळे प्रवाशांचे हाल होऊ नयेत म्हणून नाईलाजास्तव वाहकाने हा जुगाड केल्याचे समोर येत आहे. नादुरुस्त अॅक्सिलेटर दोरीने बांधून चालकाने शेवटी ती दोरी महिला कंडक्टरच्या हाती दिली. महिला कंडक्टरला चालकाने ती अॅक्सिलेटरची दोरी योग्यवेळी कमी-जास्त ओढण्यास सांगितली. अशा पध्दतीने जुगाड करत जवळ्पास 40 किलोमीटर अंतर पार करण्यात आले. अपघाताने ही घटना घडली असती तर याला जबाबदार कोण? असा प्रश्न आता विचारला जात आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या