JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Dharashiv News: 7 वर्षाच्या मुलाचा मृत्यू, आश्रम शाळेतील बाथरूममध्ये आढळला मृतदेह

Dharashiv News: 7 वर्षाच्या मुलाचा मृत्यू, आश्रम शाळेतील बाथरूममध्ये आढळला मृतदेह

धाराशिवमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. एका चिमुकल्याचा आश्रम शाळेत मृत्यू झाल्याचं समोर आलंय. हे प्रकरण समोर येताच परिसरात खळबळ उडाली आहे.

जाहिरात

7 वर्षाच्या मुलाचा संशयास्पद मृत्यू

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

बालाजी निरफळ/ धाराशिव 13 जुलै : धाराशिवमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. एका चिमुकल्याचा आश्रम शाळेत मृत्यू झाल्याचं समोर आलंय. हे प्रकरण समोर येताच परिसरात खळबळ उडाली आहे. मुलाच्या मृत्यूनंतर पालकांनी घातापाताचा संशय व्यक्त केला आहे. हे प्रकरण नेमकं काय आहे याविषयी जाणून घेऊया. धाराशिव तुळजापूर तालुक्यातील एकलव्य आश्रम शाळेत इयत्ता पहिली वर्गात शिकत असलेल्या सात वर्षीय विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आश्रम शाळेच्या बाथरूममध्ये या सात वर्षीय संस्कार राठोड या मुलाचा मृतदेह आढळून आला आहे. मुलाचा मृत्यू संशयास्पद रित्या झाला असून आई-वडिलांनी घातपाताचा संशय व्यक्त केलाय. या संदर्भात तुळजापूर पोलिसात तक्रार देण्यात आली आहे.

या प्रकरणाचा तपास सुरु असून तपास पूर्ण झाल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात येईल असं तुळजापूर पोलिसांनी सांगितलं आहे. या प्रकाराबाबत पोलीस मात्र कॅमेऱ्यासमोर बोलायला तयार नाहीत. Nashik Bus Accident : मृत्यू जवळून पाहिला…; सप्तश्रृंगी अपघातात बचावलेल्या चालकानं सांगितला अपघाताचा थरार दरम्यान, यमगरवाडी एकलव्य आश्रम शाळेतील सात वर्षीय बालकाचा मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. मुलाच्या आईने तर हंबरडाच फोडला. आता या प्रकरणी काय माहिती समोर येते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या