नाशिक, 13 जुलै : राज्यात सध्या अपघातांचा सपाटा सुरु आहे. गेल्या आठवड्याभरातच अनेक अपघात घडल्याचं समोर आलं आहे. एकपेक्षा एक भयानक अपघात घडत असून यामध्ये काहीजण जखमी होतायेत तर काहींना आपला जीव गमवावा लागत आहे. कालच नाशिक येथे मोठा अपघात घडल्याचं समोर आलं. दैव बलवत्तर होतं म्हणून या भयानक अपघातातूनही काही प्रवासी वाचले. या संपूर्ण घटनेचं वर्णन चालकानं केलं आहे. बुधवारी नाशिक येथील सप्तश्रृंगी गडाच्या घाटात बस दरीत कोसळली. पहाटेच्या वेळी हा भीषण अपघात घडला. या अपघातात 1 महिलेला आपला जीव गमावावा लागला तर 22 प्रवाशी मृत्यूच्या दारातून मागारी परतले. सप्तश्रृंगी एसटी अपघाताचा थरार सांगताना, चालक गजानन टोपे यांनी सांगितलं की मृत्यू सुदैवानं टळला मात्र आम्ही आतून पूर्णपणे हादरलो आहे.
धुक्यात वाट न दिसल्यामुळे ही घटना घडली. वळण लक्षात न आल्यामुळे आणि धुक्यामुळे क्लिअर दिसत नसल्यामुळे ही दुर्घटना घडली. बस 400 फूट दरीत कोसळली आणि दगडांवर आदळत खाली गेली. मात्र चालकानं शेवटपर्यंत बसचं स्टेअरिंग सोडलं नाही. गाडीवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे प्रवाशांचे प्राण वाचले. Shivneri Bus: शिवनेरीचा प्रवास होणार स्वस्त, आता तिकीटासाठी ‘इतके’ पैसै कमी मोजा या अपघातानंतर जीव वाचला असला, तरी मृत्यू जवळून बघितल्याने हादरलो, असं जखमी प्रवाशांनी सांगितलं. अपघाताची माहिती मिळताच पालकमंत्री दादा भुसे घटनास्थळी पोहोचले. अपघातग्रस्त झालेली बस ही खामगाव डेपोमधील असल्याची माहिती आहे.