JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / ZP Teachers Bharti: तरुण बेरोजगार अन् रिटायर्ड शिक्षकांना दिली संधी; दीपक केसरकरांच्या निर्णयाला शिक्षक संघटनांचा विरोध

ZP Teachers Bharti: तरुण बेरोजगार अन् रिटायर्ड शिक्षकांना दिली संधी; दीपक केसरकरांच्या निर्णयाला शिक्षक संघटनांचा विरोध

दरमहा 50 हजारांची पेन्शन उचलणाऱ्या रिटायर्ड शिक्षकांना 20 हजाराचे मानधनही देण्यात येणार आहे. एकीकडे लाखो डिएड, बीएड पदवीधारक नोकरीविना बेरोजगारी सहन करत आहेत

जाहिरात

केसरकरांचा निर्णय वादात

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई 13 जुलै : शालेय शिक्षणमंञी दीपक केसरकर यांनी शिक्षकांच्या नियुक्तीबद्दल घेतलेला आणखी एक निर्णय आता वादात आला आहे. केसरकर यांनी 70 वर्षीय पेन्शनधारक रिटायर्ड शिक्षकांना कंञाटी पद्धतीने नियुक्तीचे शासनआदेश काढले आहेत. अशात 55 हजार शिक्षकांच्या रिक्त जागा भरायचं सोडून आणि बेरोजगारांना संधी न देता, हा निर्णय घेतल्याने बीएड धारकांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. दरमहा 50 हजारांची पेन्शन उचलणाऱ्या रिटायर्ड शिक्षकांना 20 हजाराचे मानधनही देण्यात येणार आहे. एकीकडे लाखो डिएड, बीएड पदवीधारक नोकरीविना बेरोजगारी सहन करत आहेत. मात्र शिक्षणमंञी 70 वर्षीय रिटायर्ड शिक्षकांची कंञाटी भरती करत आहेत. त्यामुळे 70 वर्षीय सेवानिवृत कंञाटी शिक्षण भरतीविरोधात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. Teacher Transfer : घटस्फोटीत दाखवून प्रसूती रजा, पॅरालाईज्ड असून ड्रायव्हिंग; शिक्षकांच्या प्रतापाने शिक्षण क्षेत्रात खळबळ शिक्षक संघटना तसंच बेरोजगार डिएड, बीएड धारकांनी आंदोलनाचा इशाराही दिला आहे. टीईटी पाञ बेरोजगारांनाच शिक्षकपदी नियुक्त करा, अशी मागणी शिक्षक संघटना आणि बेरोजगार युवकांनी केली आहे. तरूणांना नोकरी देऊन शिक्षणाची गुणवत्ता राखा, अशी मागणी या सर्वांनी केली आहे. सेवानिवृत्त शिक्षकांची भरती करण्यास महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचा विरोध आहे. सेवानिवृत्त शिक्षकांची भरती करण्याऐवजी राज्यात डी.एड आणि बी.एड झालेले लाखो तरुण बेरोजगार आहेत. त्या सुशिक्षित बेरोजगार तरुणांमधून नागपूर जिल्हापरिषदेप्रमाणे तात्पुरती भरती करावी. नंतर पोर्टलद्वारे कायमस्वरुपी शिक्षक भरती करावी, अशी मागणी शासनाकडे करणार असल्याचं राष्ट्रीय प्राथमिक शिक्षक महासंघाने सांगितलं आहे. .

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या