मुंबई : अरबी समुद्रात चक्रीवादळ तयार होत असून पुढचे 24 तास खूप महत्त्वाते आहेत. कमी दाबाचं क्षेत्र तयार झाल्याने चक्रीवादळाचा धोका 8 ते 12 जून दरम्यान समुद्रकिनाऱ्या जवळच्या भागांना देण्यात आला आहे. गुजरातला हवामना विभागाने अलर्ट दिला आहे. गुजरातमधील अनेक जिल्ह्यांचे हवामान बिघडणार आहे. राज्यात बायपरजॉय चक्रीवादळ येणार आहे. त्यामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र तयार होत आहे. त्यामुळे येत्या दोन दिवसांत त्याचे चक्रीवादळात रूपांतर होईल. गुजरातशिवाय महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्येही या चक्रीवादळाचा प्रभाव दिसून येईल.
हवामान खात्याने म्हटले आहे की, 5 ते 7 जून दरम्यान, बियपरजॉय चक्रीवादळामुळे, वादळी वाऱ्यासह पाऊस पडेल. वाऱ्याचा वेग ताशी ५० किमी पर्यंत असू शकतो. गुजरातमधील बनासकांठा, साबरकांठा, अरवली जिल्ह्यात जोरदार वाऱ्यासारखा पाऊस पडू शकतो. यासोबतच पाटण, मोडासा, मेहसाणासह इतर भागातही पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
चक्रीवादळाला मोचा हे नाव कसं पडलं?महाराष्ट्रात मुंबईसह कोकण समुद्र किनाऱ्यावर अलर्ट जारी केला आहे. मासेमारी करणाऱ्यांना समुद्रात न जाण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. दुसरीकडे विदर्भात तीव्र उष्णतेची लाट 7 ते 9 जून दरम्यान राहू शकते असं हवामान विभागाने म्हटलं आहे.
कसं ठरवलं जातं चक्रीवादळाचं नाव?मान्सूनसाठी अजूनही प्रतीक्षा करावी लागणार आहे. उकाड्याने हैराण झालेले लोक आता मान्सूनची वाट पाहात आहेत. हे चक्रीवादळ मान्सूनच्या वाटेत अडथळे निर्माण करणार का याकडे हवामान विभाग लक्ष्य ठेवून आहे.