JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / भरधाव कंटेनरने दुचाकीला चिरडलं, 100 फूट नेलं फरफटत, तिघांचा जागीच मृत्यू

भरधाव कंटेनरने दुचाकीला चिरडलं, 100 फूट नेलं फरफटत, तिघांचा जागीच मृत्यू

मुंबई अहमदाबाद महामार्गावर डहाणूतील चारोटी इथं हा भीषण अपघात झाला

जाहिरात

मुंबई अहमदाबाद महामार्गावर डहाणूतील चारोटी इथं हा भीषण अपघात झाला

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

राहुल पाटील, प्रतिनिधी पालघर, 14 फेब्रुवारी : पुणे-नाशिक महामार्गावर अपघाताची घटना ताजी असताना पालघरमध्ये अपघाताची दुर्दैवी बातमी समोर आली आहे. मुंबई-अहमदाबाद महामार्गावर भरधाव कंटेनरने एका दुचाकीला जोराची धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील 3 जणांचा जागीच मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई अहमदाबाद महामार्गावर डहाणूतील चारोटी इथं हा भीषण अपघात झाला. भरधाव कंटेनरने ट्रिपल सीट असलेल्या बाईकस्वारांना चिरडलं. अपघातात 3 बाईकस्वारांचा जागीच मृत्यू झाला. चारोटी एशियन पेट्रोल पंप जवळ ही घटना घडली. हा अपघात इतका भीषण होता की, भरधाव कंटेनरने दुचाकीला धडक दिल्यानंतर बाईकसह बाईकस्वारांना 100 मीटरपेक्षा अधिक अंतर फरफटत नेलं. (धक्कादायक! प्रियकर भाऊ असल्याचं भासवत पतीला दिलं विष, वाचा कसा झाला खुलासा) तिन्ही बाईकस्वार तलासरी येथील असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तिन्ही तरुणाचे मृतदेह ताब्यात घेण्यात आले असून शासकीय रुग्णालयात हलवले आहे. कंटेनर चालकाचा शोध घेतला जात आहे. दरम्यान, पुणे-नाशिक महामार्गावरील राजगुरुनगर जवळ असलेल्या शिरोली परिसरात सोमवारी रात्री ही घटना घडली. पुणे बाजूकडून नाशिककडे जाणाऱ्या लेनवर रात्री 11 वाजेच्या सुमारास ही घटना घडली. पुणे शहरातून खेड तालुक्यातील शिरोली येथील मंगल कार्यालयात स्वयंपाकासाठी रात्रीच्या सुमारास या महिला येत होत्या. त्याचवेळी महिंद्रा कंपनीच्या कारने या महिलांना रस्ता ओलांडताना ठोकर देऊंन वाहन चालक रस्ता दुभाजक तोडून वाहनासह फरार झाला. (Nashik : रेल्वे स्टेशनवर मिळणार शुद्ध हवा, पाहा कसं आहे देशातील पहिलं ऑक्सिजन पार्लर! Video) या अपघातात 5 महिलांचा मृत्यू झाला आहे. तर 7 महिला जखमी आहे. जखमी महिलावर खाजगी आणि चांडोली ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहे. फरार वाहन चालकाचा खेड पोलिसांकडून तपास सुरू आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या