नाना पटोलेंना शह देण्यासाठी भाजपची राष्ट्रवादीसोबत युती
भंडारा, 30 एप्रिल : अखेर नाना पटोले यांनी लाखांदूर कृषी उत्पन्न बाजार समिती वर काँग्रेसची सत्ता कायम ठेवली आहे. काँग्रेस पक्ष समर्पित पॅनलचे 14 उमेदवार विजयी झाले असून भाजपा राष्ट्रवादी युतीला फक्त 4 जागा मिळाल्या. या ठिकाणी नाना पटोले यांना एकटं पाडण्यासाठी भाजपाने आपला राजकीय शत्रू असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेससोबत हातमिळवणी करीत युती केली होती. नाना पटोले यांच्या मतदार संघातील ही महत्त्वाची कृषि उत्पन्न बाजार समिती समजल्या जात होती. यामध्ये काँग्रेसने मोठं यश संपादन केले आहे. काल लाखनी येथील कृषि उत्पन्न बाजार समिती गमावल्यानंतर लाखांदूर कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक जिंकली आहे. तर भाजपा राष्ट्रवादी युतीला मोठा धक्का बसला आहे. कृषी उत्पन्न बाजार समितींसाठी निवडणूक सहकार क्षेत्रावर पकड मजबूत ठेवण्यासाठी ही निवडणूक सर्वच राजकीय पक्षांच्या दृष्टीने महत्त्वाची आहे. या निवडणुकीसाठी भाजपचे आमदार परिणय फुके यांनी प्रतिष्ठा पणाला लावली होती. काँग्रेसला दूर ठेवण्यासाठी गोंदिया जिल्हा परिषद असो की भंडारा जिल्ह्यातील मोहाडी नगरपंचायत प्रमाणे भाजपाने आपला शत्रू असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेससोबत युती करीत काँग्रेसला धक्का दिला. गोंदिया जिल्ह्यात 2 कृषि उत्पन्न बाजार समितीची निवडणूक पार पडली असून निवडणुकीत अभद्र युती झाली. भाजपा, राष्ट्रवादी, शेतकरी पॅनल लढवत आहे. तर काँग्रेस ही स्वबळावर लढत आहे. नाना पटोले यांना मात देण्यासाठी अभद्र युती झाली असल्याचे पाहायला मिळतं आहे. वाचा - तुरुंगातून बाहेर येताच सत्यजीत चव्हाण पवारांच्या भेटीला; जितेंद्र आव्हाडही उपस्थित नाना पटोले यांना होमग्राउंडवर मोठा धक्का या निवडणुकीसाठी भाजप आणि राष्ट्रवादी एकत्र आले. त्यामुळे काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांच्याच होम ग्राउंडवर यांना मोठा धक्का असल्याचे समजण्यात येते. राजकारणात कधी काय घडेल याचा नेम नाही. भंडाऱ्यापाठोपाठ गोंदियामध्ये भाजप आणि राष्ट्रवादीचा पॅटर्न पाहण्यास मिळाला. भाजपने राष्ट्रवादीसोबत घरोबा करीत काँग्रेसलाच हात दाखविला. तेव्हा नाना पटोले चांगलेच संतापलेले होते. यावरून असे सिद्ध होते की नाना पटोले यांना त्यांच्या जिल्ह्यात एकटा पाळण्याच्या डाव त नाहीना.